महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात वीज केंद्राला ठोकले टाळे - former energy minister Chandrasekhar Bavankule

भाजपाकडून राज्यभरात ठिकठिकाणी हल्लाबोल आंदोलन करण्यात येत आहे. नागपुर शहरात आणि जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हे आंदोलन केले जात आहे. सर्वात आधी राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदार संघातील कोराडी येथे असलेल्या महावितरणच्या कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले.

माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात वीज केंद्राला ठोकले टाळे
माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात वीज केंद्राला ठोकले टाळे

By

Published : Feb 5, 2021, 12:33 PM IST

नागपूर -भाजपाकडून राज्यभरात ठिकठिकाणी हल्लाबोल आंदोलन करण्यात येत आहे. नागपुर शहरात आणि जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हे आंदोलन केले जात आहे. सर्वात आधी राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदार संघातील कोराडी येथे असलेल्या महावितरणच्या कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी महावितरणच्या कार्यालयाला कुलूप देखील ठोकले.

माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात वीज केंद्राला ठोकले टाळे

वाढीव वीज बिलांचा मुद्दा
महावितरणाने राज्यातील 75 लाख वीज ग्राहकांना कोरोना काळातील विज बिल भरले नाही म्हणून वीज पुरवठा खंडित करण्यासाठी नोटीस पाठवल्या आहेत. त्यामुळे चार कोटी जनतेला अंधारात लोटलयाचा आरोप माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. सरकारच्या या मोगल शाही कारभाराविरोधात राज्यात अनेक ठिकाणी हल्लाबोल आंदोलन केले जात आहे. त्यानंतर जर सरकारने वाढीव वीज बिल कमी करून दिले नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय.



वीज बिल विरोधात भाजपचे दहावे आंदोलन
लॉकडाऊन काळात सामान्य नागरिकांना भरमसाट विजेचे बिल आले होते. या विरोधात भाजपाच्यावतीने नागपूर शहरात तब्बल ९ वेळा आंदोलन करण्यात आले. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नसल्याने आता दहावे आंदोलन सुरु केले आहे. सरकारने ज्या वीजग्राहकांना नोटीस पाठवून वीजपुरवठा खंडित करण्यासाठी कर्मचारी पाठवल्यास त्या ठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते उभे राहतील, असे देखील बावनकुळे म्हणाले आहेत.


हेही वाचा -मराठा आरक्षण : ८ मार्चपासून सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार

ABOUT THE AUTHOR

...view details