नागपूर -काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा उसरे यांचा निर्घृण खून झाला. गड्डीगोदाम परिसरातील भारत टॉकीजजवळ उसरे यांच्यावर दोन अज्ञात आरोपींनी कुऱ्हाडीने वार करत त्यांचा खून केला. उसरे यांची हत्या नेमकी कोणत्या करणामुळे झाली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी जुन्या वादातून ही घटना घडल्याची शंका व्यक्त केली जात आहे. शहरातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा उसरे यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या - नगरसेवक देवा उसरे खून
माजी नगरसेवक देवा उसरे गड्डीगोदाम परिसरात आले असता दोन आरोपींनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. यामध्ये त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जुन्या वादातून ही घटना घडल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
खून
माजी नगरसेवक देवा उसरे गड्डीगोदाम परिसरात आले असता दोन आरोपींनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. यामध्ये त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती समाजताच सदर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत दोन्ही आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी देवा उसरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.