नागपूर -शेतातील विहिरीत पडलेल्या नीलगाईला जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले. जिल्ह्यातील खापरी येथील संरक्षित क्षेत्रातील धामणगाव शिवारात एका विहिरीत ही नीलगाय पडली होती.
विहिरीत पडलेल्या नीलगाईला बाहेर काढण्यात यश - नीलगाईला बाहेर काढण्यात यश
नागपूरच्या खापरी शिवारात विहिरीत नीलगाय पडल्याचे समजताच ग्रामस्थांनी वनविभागाला सूचना दिली. त्यानंतर वनविभागाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर नीलगायला बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू झाले.

नागपूरच्या खापरी शिवारात विहिरीत नीलगाय पडल्याचे समजताच ग्रामस्थांनी वनविभागाला सूचना दिली. त्यानंतर वनविभागाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर नीलगायला बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू झाले. ही नीलगाय जवळपास ५ वर्षांची होती. तसेच तिचे वजन देखील जास्त होते. त्यामुळे तिला बाहेर काढताना अडचण येत होती. मात्र, तब्बल ४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर विहिरीत पडलेल्या नीलगाईला दोरी बांधून जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. बाहेर येताच नीलगाईने जंगलाकडे धूम ठोकली.
हे वाचलं का? - थंडीची चाहूल लागताच पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवर 'कलहंस' पक्षांचे आगमन