नागपूर - शहरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. परिणामी सर्वत्र, लिंबूपाणी, ऊसाचा रस, बर्फाचा गोळा, असे अनेक शीतपेयांचे स्टॉल आणि गाड्या लागायला सुरुवात झाली आहे. मात्र, यामध्ये अस्वच्छ बर्फ आणि रासायनिक रंगांचा वापर केलेला आढळतो. या सर्व शीतपेयांवर आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाची करडी नजर असणार आहे.
शीतपेयांवर असणार अन्न व औषध विभागाची करडी नजर - fda
या सर्व शीतपेयांवर आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाची करडी नजर असणार आहे.
शीतपेयांचे स्टॉल
विशेष म्हणजे उघड्यावर गाड्या लावणारे अनेक दुकानदार विना विनापरवानाच ही दुकाने उघडून बसले आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच नागपूरचे तापमान ३७ अंशावर पोहोचले आहे. दुपारच्या सुमारास उन्हाचे चटकेबसायला सुरुवात झाली आहे. या सर्व शीतपेयांच्या विनापरवाना स्टॉल्सची तपासणी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. यासोबतच शीतपेयांची असुरक्षित हाताळणी करणाऱ्यांना नियमांची माहिती देण्यात येईल अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे विभागीय उपायुक्त शशिकांत केकरे यांनी दिली आहे.