नागपूर:ध्वजारोहणानंतर महानगर संघचालक राजेश लोहिया म्हणाले की आपण स्वीकारलेल्या गणतंत्रा अनुसार आतापर्यंत आपण चाललो की नाही, पुढे किती चालायला हवे,याचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. स्वातंत्र्य मिळवून देणारे क्रांतीवीर जे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते त्यांची देखील आठवण आजच्या दिवशी करावी असं ते म्हणाले. देशाला प्रगतीच्या वाटेवर सर्व घेऊन जाण्याचा संकल्प सर्वांनी करावा असे आवाहन त्यांनी केले.
RSS Flag Hoisting : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुर मुख्यालयात ध्वजारोहण - nagpur update
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) नागपूर येथील मुख्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त (occasion of Republic Day) ध्वजारोहण ( Flag Hoisting at Headquarters ) करण्यात आले. नागपूर महानगरसंघचालक राजेश लोया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संघाचे काही ठराविक स्वयंसेवक उपस्थित होते. सरसंघचालक मोहन भागवत दौऱ्यावर असल्याने ते ध्वजारोहण कार्यक्रमात उपस्थित नव्हते.
संघाच्या मुख्यालयात ध्वजारोहण
कडक सुरक्षा
दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याने आरएसएस मुख्यालयाची रेकी केल्याची माहिती सुरक्षा एजन्सीज कडून नागपूर पोलिसांना देण्यात आली होती. तेव्हा पासून नागपूर पोलिसांनी संघ मुख्यालयाची सुरक्षा वाढली आहे. परिसरात देखील अनोळखी व्यक्तीला प्रवेश नाकारण्यात आला आहे. संघ मुख्यालय परिसरात फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे.