महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात पोलिसांचेच ड्रग्स माफियांशी साटेलोटे, पाच पोलीस निलंबित

नागपूरमधील नंदनवन पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने १४ ऑक्‍टोबरला अमली पदार्थ जप्त केले होते. या कारवाईत जमाल शेख आणि जावेद अली यांच्यासह त्यांच्या काही साथीदारांना अमली पदार्थासहित पकडले होते. या कारवाई दरम्यान जमाल पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेला होता. हे प्रकरण दाबण्यासाठी आरोपी जावेदला हवालदार सचिन एनप्रेड्डीवार यांनी अडीच लाखांची मागणी करत जप्त केलेले ड्रग्ससुद्धा ठेवून घेतले होते.

नागपूरात पोलिसांचेच ड्रग्स माफियांशी साटेलोटे, पाच पोलीस निलंबित

By

Published : Oct 22, 2019, 7:19 PM IST

नागपूर -पोलीस उपायुक्तांनी नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये छापा टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत ३४ ग्रॅम अमली पदार्थ आणि २ लाख ४५ हजार रुपये जप्त करण्यात आले असून ड्रग्स माफियांशी संबंध असलेल्या पाच पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे नागपूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

नागपूरात पोलिसांचेच ड्रग्स माफियांशी साटेलोटे, पाच पोलीस निलंबित

नागपूरमधील नंदनवन पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने १४ ऑक्‍टोबरला अमली पदार्थ जप्त केले होते. या कारवाईत जमाल शेख आणि जावेद अली यांच्यासह त्यांच्या काही साथीदारांना अमली पदार्थासहित पकडले होते. या कारवाई दरम्यान जमाल पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेला होता. हे प्रकरण दाबण्यासाठी आरोपी जावेदला हवालदार सचिन एनप्रेड्डीवार यांनी अडीच लाखांची मागणी करत जप्त केलेले ड्रग्ससुद्धा ठेवून घेतले होते.

हेही वाचा -मुंबईत लिफ्टमध्ये अडकून महिलेचा मृत्यू

गुन्हे शोध पथकाकातील कर्मचाऱ्यांनी २ लाख ४५ हजार रुपये आणि ३४ ग्रॅम एमडी ड्रग पोलीस स्टेशन मध्येच ठेवून घेतले पण पुढील कोणतीही कारवाई केली नाही. या संपूर्ण प्रकरणाची माहिती वरिष्ठांना मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्तांनी केलेल्या कारवाईत नंदनवन पोलीस स्टेशनमधून अमली पदार्थ आणि २ लाख ४५ हजार रुपये जप्त करण्यात आली. या प्रकरणात पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

हेही वाचा -पासोडीत गांजा शेतीवर पोलिसांचा छापा, 19 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त

नंदनवन पोलीस स्टेशनमधील या कारवाईत पोलीस उपायुक्तांनी आरोपी पोलीस हवालदार सचिन एनप्रेड्डीवार, नायक शिपाई राजेंद्र शिरभाते, दिलीप अवगन, रोशन निंबर्ते आणि अभय मारोडे यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली आहे. ड्रग्स माफियाशी संबंध असलेल्या या पोलिसांवर कारवाई झाल्याने नागपूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details