महाराष्ट्र

maharashtra

Nagpur Car Accident: चालकाला आली झोपेची डुलकी अन् कार उड्डाण पूलावरून थेट खाली रेल्वे ट्रॅकवर कोसळली, पाच गंभीर जखमी

By

Published : Jul 2, 2023, 12:38 PM IST

नागपूर जिल्ह्यातील बोरखेडी येथे कारचा भीषण अपघात झाला आहे. बोरखेडी शिवारात अनियंत्रित कार उड्डाणपूलावरून थेट खाली रेल्वे ट्रॅकवर कोसळली. त्यामुळे पाच प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत.

Nagpur Car Accident
कार अपघात

नागपूर :समृद्धी महामार्गावर शनिवारी विदर्भ ट्रॅव्हल्स बसला झालेला अपघात अगदी ताजा आहे, असे असताना आज सकाळी नागपूर जिल्ह्यातील बोरखेडी येथे भरधाव कार अनियंत्रित उड्डाणपूलाची मजबूत सुरक्षा भिंत तोडून थेट खाली रेल्वे ट्रॅकवर कोसळल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाश्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार चालकांला झोपेची डुलकी आल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

चालकाला आली झोपेची डुलकी :जखमींमध्ये श्रेया बैस, कविश काकडे यांचा समावेश आहे. हा कार अपघात नागपूर-हैदराबाद महामार्गावरील बोरखेडी शिवारात घडला आहे. अपघातग्रस्त कार हैदराबाद येथून नागपूरच्या दिशेने जात होती. त्यावेळी कारच्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. चालकाला झोपेची डुलकी आल्याने कार अनियंत्रित होऊन थेट बोरखेडी शिवारात उड्डाणपूलावरुन थेट रेल्वे रेल्वे ट्रॅकवर कोसळली.


पाच प्रवाशी जखमी :ज्यावेळी भरधाव कार उड्डाणपूलावरून खाली पडली. त्यावेळी कारमध्ये एकाच कुटुंबातील ५ सदस्य होते. सर्वांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे सर्वांना उपचारासाठी बुटीबीरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार पुलावरून खाली पडल्यामुळे कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच बुटीबीरी पोलिसांसह महामार्ग पोलीसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत घेतली आहे.



रेल्वे सेवा विस्कळीत :भरधाव कार उड्डाणपुलाचा कठडा तोडून थेट रेल्वे ट्रॅकवर पडल्यामुळे रेल्वेची सुमारे अडीच तास रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. कार पुलावरून खाली कोसळल्याने रेल्वेची ओवर हेड वायर तुटली होती. शिवाय अपघातग्रस्त कारचा मलबा देखील रेल्वे ट्रॅकवर पडल्यामुळे नागपूर मुंबई आणि नागपूर चेन्नई मार्गावरील सर्व गाड्यांना जागच्या जागीच थांबवावे लागले. त्यामुळे विदर्भ एक्सप्रेस, दक्षिण एक्सप्रेस, गरीब रथ यासह अनेक गाड्या सुमारे अडीच ते तीन तास उशिराने धावत आहेत.

हेही वाचा :

  1. Satara Bus Accident : ट्रॅव्हल्सची कंटेनरला पाठीमागून धडक; तरूण जागीच ठार तर चौघे जखमी
  2. Buldhana Bus Accident : कारंजात चालक जेऊन झोपला, तो कायमचाच; बसमधील प्रवाशांच्या मृतदेहाचा झाला कोळसा तर काही अर्धवट जळाले
  3. Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, लोखंडी पोलवर आदळली खाजगी बस त्यानंतर समृद्धी महामार्गावर घडला अनर्थ

ABOUT THE AUTHOR

...view details