नागपूर- लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. यात विदर्भातील १० पैकी ७ मतदारसंघाचा समावेश आहे. आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणुकांमध्ये युवकांची भूमिका महत्त्वाची ठरते, त्यामुळे यावेळी देखील नवमतदार मोठ्या प्रमाणात आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचत आहेत.
First Voters - देशाचा विकासासह शैक्षणिक मुद्यांसाठी नवमतदारांचे मतदान - polling
देशाच्या विकासापासून ते शैक्षणिकतेच्या मुद्दयांवर आमचा जास्त भर असल्याचे नागपूरचे नवमतदार सांगत आहेत. त्याचबरोबर सर्व युवकांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहनही नवमतदार करत आहेत.

नवमतदारांसोबत बातचीत
नवमतदारांसोबत बातचीत केली आहे 'ई-टीव्ही भारत' च्या प्रतिनिधी मोनिका अक्केवार यांनी
देशाच्या विकासापासून ते शैक्षणिकतेच्या मुद्दयांवर आमचा जास्त भर असल्याचे नागपूरचे नवमतदार सांगत आहेत. त्याचबरोबर सर्व युवकांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहनही नवमतदार करत आहेत.
या नवमतदारांसोबत बातचीत केली आहे 'ई-टीव्ही भारत' च्या प्रतिनिधी मोनिका अक्केवार यांनी...