नागपूर -पहिले राष्ट्रीय ओबीसी महिला संमेलन नागपुरात संपन्न झाले. ओबीसी महिलांना हक्काचं व वैचारिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने या २ दिवसीय ओबीसी महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. नागपुरात आयोजित या पहिल्या ओबीसी महिला साहित्य संमेलनाला महिला साहित्यिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
राज्यात अनेक ठिकाणी अनेक प्रकारची साहित्य संमेलने होत असतात. आता यात ओबीसी महिला साहित्य संमेलनाची भर पडली आहे. महिलांजवळ लेखणी, अभिव्यक्ती आणि समज आहे. या तीनही गोष्टी एकत्र झाल्या तर उद्याचा समज घडू शकेल. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून व्यासपीठावर महिलांचा नवा-कोरा आवाज ऐकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ओबीसी महिला साहित्यिकांच्या माध्यमातून शेती, शेतकऱ्यांचे दुःख व शेतीमधील महिलांचे दुःख समोर येण्यास मदत होईल, असेही उपस्थित साहित्यिकांनी यावेळी सांगितले.