नागपूर -शहरातील महात्मा फुले भाजी बाजारातील काही दुकानांना आज दुपारी आग लागली. या आगीत 18 दुकाने जाळून खाक झाली. महात्मा फुले भाजी बाजार हा नागपूरच्या मध्यवर्ती भागातील मोठा भाजी बाजार आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा बाजार गेले 50 दिवस बंद ठेवण्यात आला होता, ज्यानंतर गेल्याच आठवड्यात अटी व शर्तींसह हा बाजार खुला करण्यात आला आहे.
आठवड्याभरापूर्वी सुरू झालेल्या कॉटन मार्केटला आग; १८ दुकाने जळून खाक - नागपूर आग बातमी
अग्निशामक दलाला सूचना देण्यात आली तोपर्यंत पाहता पाहता ही आग रांगेतील १८ दुकानांपर्यंत पोहचली. अग्निशामक दलाच्या ८ गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
आठवड्याभरापूर्वी सुरू झालेल्या कॉटन मार्केटला आग; १८ दुकाने जळून खाक
बाजारातील एका दुकानास आज दुपारी सव्वा चारच्या सुमारास आग लागली. अग्निशामक दलाला सूचना देण्यात आली तोपर्यंत पाहता पाहता ही आग रांगेतील १८ दुकानांपर्यंत पोहोचली. अग्निशामक दलाच्या ८ गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.