नागपूर- अमरावती महामार्गावरील, सातनवरी गावाजवळील इंडस पेपर मिलमध्ये लागलेली आग रात्री 9 वाजताच्या सुमारास नियंत्रणात आली आहे. यामध्ये आता कुलिंग प्रोसेस सुरू असून जवळपास पाच ते सहा तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले आहे. सुदैवाने या आगीत जीवितहानी झालेली नाही. पण मोठ्या प्रमाणात पेपर जळल्याने कोटीच्या घरात नुकसान झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
इंडस पेपरमिल कंपनीच्या आगीवर नियंत्रण; कोटींच्या घरात नुकसान कच्चा मालासह पक्क्या मालाचेही नुकसान
या आगीत कागद, टिशू पेपर, टॉयलेट पेपर, किचन पेपर आणि खर्डे जळून खाक झाले आहे. इंडस पेपर मिलमध्ये टिश्यू पेपर, टॉयलेट पेपर, किचन पेपर व खर्डे याचा मोठा साठा ठेवून होता. सोबतच या ठिकाणी कच्चा माल साठवलेला होता. पंधरा दिवसापासून कंपनीचे कामकाज कोरोनामुळे बंद होते. कंपनीपासून काही अंतरावर पेपर साठवून ठेवण्यासाठी ३ एकर जागेत ४ गोदाम असून त्या मध्ये कच्चा व पक्का माल मिळून एकूण ४ हजार टन पेपर साठवलेला होता.
आगीत मोठे आर्थिक नुकसान
दुपारी जेव्हा गोदामात अचानक आग लागली. त्याच दरम्यान जोराचे वादळ आल्याने आगीने लगेच रौद्र रूप धारण केले. आग चारही गोदामात पसरली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यास अडचण झाली असून आग वाढण्यास कारणीभूत ठरले आहे. या आगीत करोडो रूपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. संध्याकाळ पासून जवळच्या सोलार कंपनी, नागपूर महानगर पालिका, कळमेश्वर, वाडी, हिंगणा इथल्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. रात्री 9 वाजता आगीवर नियंत्रण मिळाले असून आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
दोन वर्षात तिसरी आगीची घटना
1993 साली या कंपनीची सुरवात झाली होती. या कंपनीचे मालक हे मनोज पाचेसिया असून ते बंगळुरूचे आहे. मागील दोन वर्षात तिसऱ्यांदा आगीची घटना असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.
हेही वाचा -बेजबाबदारपणा.. कोविड सेंटरमध्ये उपचार घेणारे रूग्ण फळ खरेदीसाठी विनामास्क फिरतात बाहेर; पाहा व्हिडिओ