नागपूर- गंजीपेठ भागात असलेल्या संदेश दवा बाजारातील पुणित मेडिकल एजन्सीला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या आगीवर नियंत्रम मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
नागपुरातील संदेश दवा मार्केटला शॅार्टसर्किटमुळे भीषण आग; जीवितहानी नाही - fire brigade
सध्या परिस्थिती नियंत्रणात आली असून आगीवरही नियंत्रण मिळवण्यात आले आहे. या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली, तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गंजीपेठ परिसरात असलेल्या दवा बाजारात अनेक मेकीकल एजन्सीजचे दुकाने आहेत. आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास पाचव्या मजल्यावर असलेल्या पुणित मेडिकल एजन्सीमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. घटनेची माहिती समाजताच अग्निशमन विभागाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तब्बल 2 तासांचा वेळ लागला.
सध्या परिस्थिती नियंत्रणात आली असून आगीवरही नियंत्रण मिळवण्यात आले आहे. या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली, तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.