महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूरच्या 'पेपर बोर्ड कंपनी'ला भीषण आग, नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू - नागपूर आग बातमी

नागपूर-अमरावती महामार्गावर सातनवरी गावाजवळ इंडस पेपर बोर्ड नावाची कंपनी असून तिथे कागदी हार्डबोर्ड आणि खर्डे बनवण्याचे काम केले जाते. या कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे.

आग
आग

By

Published : May 3, 2021, 6:45 PM IST

Updated : May 3, 2021, 7:00 PM IST

नागपूर -जिल्ह्यातील कोंढाळी जवळ "इंडस पेपर बोर्ड" या कंपनीच्या गोदामात मोठी आग लागली आहे. नागपूर-अमरावती महामार्गावर सातनवरी गावाजवळ इंडस पेपर बोर्ड नावाची कंपनी असून तिथे कागदी हार्डबोर्ड आणि खर्डे बनवण्याचे काम केले जाते. याच ठिकाणी अचानक लागेल्या आगीने रौद्ररूप धारण केले आहे. तसेच या याठिकाणी मोठ्या प्रमाणात आग पसरली असून अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे.

घटनास्थळ

कंपनीच्या गोदामात मोठ्या प्रमाणावर कागद आणि इतर आवश्यक कच्चामाल साठवलेला असतो. आज (दि. 3 मे) दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान याच गोदामात अचानक आग लागली. गोदामात मोठ्या प्रमाणात कच्चा माल आणि इतर साहीत्य हे साठवून असल्याने आग पसरलेली आहे.

यानंतर लगेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. मात्र, अद्यापही आगीवर नियंत्रण मिळवलता आलेले नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

हेही वाचा -ग्रामीण भागात सक्षम वैद्यकीय सुविधा उभारा; पालकमंत्री डॉ. नितीन राऊतांच्या सूचना

हेही वाचा -उपराजधानीत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट, पण मृत्यूचा आकडा वाढला

Last Updated : May 3, 2021, 7:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details