नागपूर- नागपूर-अमरावती महामार्गावर लिंबू वर्गीय फळ संशोधन केंद्र आणि विद्यापीठ कॅम्पसच्या पाठीमागे जंगलात मोठी आग लागली. आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही आग लागली. अग्निशमन दलाच्या दहा पेक्षा अधिक गाड्या आगीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर झुडुपे असून, वन विभागाने मुनगंटीवार यांच्या काळात या भागात मोठी वृक्षारोपण मोहीम राबवली होती.
हेही वाचा -गुन्हेगारांसोबत काढलेल्या फोटोवर गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्पष्टीकरण
हजारोंच्या संख्येने या भागात वृक्षारोपण असून छोटे प्राणी आणि पक्षी मोठ्या प्रमाणात आहेत. या आगीत त्यांना दुखापत होण्याची शक्यता आहे. २ वर्षापूर्वी तयार झालेल्या या जैवविविधता उद्यानामुळे शहरालगत निसर्ग भ्रमणाची संधी नागपूरकरांना उपलब्ध झाली आहे. या भागात मोर, हरीण, कोल्हे या सारख्या प्राण्यांचे आणि पक्षांचे वास्तव्य आहे. मात्र, आग लागल्यामुळे या प्राण्यांचे आणि पक्षांचे अधिवास धोक्यात आले आहे.