नागपूर -जिल्ह्यातील नागपूर भंडारा रोडवरील महालगाव कापसी परिसरात एका लाकूड आरा मशीनला मोठी आग लागल्याची घटना काल रात्री अकराच्या सुमारास घडली. सर्वत्र लाकूडफाटा असल्याने आगीने उग्र रूप धारण केले. अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या असून सात गाड्या आग विझविण्याचा प्रयत्न करत आहे.
हेही वाचा -सुवर्ण पदक विजेती बॉक्सर अल्फिया पठाणचे नागपूर नगरीत स्वागत
अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या लाकूड कारखान्यात मोठ्या प्रमाणावर लाकूडसाठा उपलब्ध होता. अचानक लागेल्या आगीने भडका घेतला व ती सर्वत्र तीव्रतेने पसरली. यामुळे लागलीच अग्निशमनला पाचारण करण्यात आले. दरम्यान परिसरातील लोकवस्ती या ठिकाणापासून लांब असल्यामुळे कुणाच्याही जीविताला धोका नसल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा -नितीन गडकरींच्या विनंतीला मान देऊन 'स्पाईस हेल्थ'ची आरटीपीसीआर टेस्टिंग लॅब नागपूरात दाखल