महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी नाना पटोलेंसह काँग्रेसच्या ४ नेत्यांवर गुन्हा दाखल

सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा कारणावरुन काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या ४ नेत्यांविरुद्ध नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

नाना पटोलेंसह काँग्रेसच्या ४ नेत्यांवर गुन्हा दाखल

By

Published : May 26, 2019, 4:32 PM IST

नागपूर - सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा कारणावरुन काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या ४ नेत्यांविरुद्ध नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाना पटोलेंसह काँग्रेसच्या ४ नेत्यांवर गुन्हा दाखल

23 मे रोजी नागपूरच्या कळमना धान्य मार्केटमध्ये लोकसभा निवडणुकीची मतमोजणी करण्यात आली होती. यावेळी मतमोजणी केंद्रावर नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते अभिजित वंजारी, नगरसेवक बंटी शेळके आणि प्रशांत पवार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुद्गल यांच्याशी मतदानाच्या आकडेवारीवरून वादावादी केली होती. याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या तक्रारीवरून कळमना पोलीस स्टेशनमध्ये नाना पटोले, अभिजित वंजारी, बंटी शेळके यांच्या विरोधात आयपीसी १८८ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details