महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या' चालकाला अमानूष मारहाण प्रकरण, पोलिसांकडून 5 जणांवर गुन्हा दाखल

पीडित हा चालक असून विक्की आगलावे असे त्याचे नाव आहे. ट्रान्सपोर्ट मालक अखिल पोहनकर हा युवासेनेचा तालुका पदाधिकारी आहे. वडधामना परिसरात ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने आपल्या चालकाला क्रूरपणे बांधून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

नागपूर

By

Published : Jul 29, 2019, 7:10 PM IST

नागपूर- वडधामना परिसरात ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने आपल्या चालकाला क्रूरपणे बांधून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारावर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे. महत्वाचे म्हणजे या ट्रान्सपोर्टचा मालक अखिल पोहनकर हा युवासेनेचा तालुका पदाधिकारी आहे.

चालकाला अमानूष मारहाण प्रकरणात पोलिसांनी केला 5 जणांवर गुन्हा दाखल

या व्हायरल झालेल्या व्हिडिओत एका व्यक्तीला वरती पाय बांधून पट्ट्याने आणि काठीने त्याला मारहाण केली जात असल्याचे दृश्य दिसत आहे. त्याच्या गुप्तांगावरसुद्धा मारहाण केल्याचे दिसून येत आहे. पीडित हा चालक असून विक्की आगलावे, असे त्याचे नाव आहे. ट्रान्सपोर्ट मालक अखिल पोहनकर हा युवासेनेचा तालुका पदाधिकारी आहे. मात्र, ज्याप्रमाणे ही मारहाण करण्यात आली, ही त्याला किंवा त्याच्या पक्षाला नक्कीच शोभा देणारी नाही. पोलिसांनी व्हायराल व्हिडिओचा सहारा घेत अखिल पोहनकरसह पाच जणांना यात अटक केली आहे.

विक्की हा गेल्या सहा महिन्यांपासून यांच्याकडे चालक म्हणून काम करत होता. त्याला ट्रिप घेऊन त्रिवेंद्रमला जायचे होते. त्यासाठी त्याला तीस हजार रुपये दिले होते. मात्र, तो ती ट्रिप घेऊन गेला नाही आणि त्याने पैसे खर्च केले. त्यानंतर 2 दिवस तो ड्युटीवरसुद्धा आला नाही. मात्र, जेव्हा तो आला तेव्हा त्याच्यासोबत जे घडले ते व्हिडिओमधून दिसून येत आहे.

शिवसेना हा पक्ष नेहमी अन्यायविरुद्ध लढत आला आहे. आताही गरिबांसोबत उभा आहे. त्यामुळे याने केलेले हे अमानूष कृत्य पक्ष खपवून घेणार नाही. याबद्दल वरिष्ठांच्या सगळी माहिती लक्षात आणून देण्यात आली असून वरिष्ठ यावर निश्चित योग्य कारवाई करेल, असे शिवसेनेचे तालुकाअध्यक्षांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details