महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Financial fraud with Umesh Yadav In Nagpur : उमेश यादवची ४४ लाख रुपयांची फसवणूक, मित्रानेच दिला दगा - उमेश यादवची पोलीस तक्रार

भारतीय क्रिकेट संघातील प्रमुख खेळाडू उमेश यादवने ४४ लाख रुपयांनी आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार नागपूरच्या कोराडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. उमेश यादवचे मित्र आणि माजी मॅनेजर शैलेश ठाकरेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Financial fraud with Umesh Yadav In Nagpur
उमेश यादवची ४४ लाख रुपयांनी फसवणूक

By

Published : Jan 21, 2023, 7:10 PM IST

Updated : Jan 21, 2023, 7:15 PM IST

नागपूर :उमेश यादवने शैलेशकडे बँक खात्यात ४४ लाख रुपये जमा करण्यासाठी ठेवले होते. मात्र, शैलेशने ती रक्कम स्वत:च्या नावावर संपत्ती खरेदी करण्यासाठी उपयोगात आणल्याचा आरोप आहे.

विश्वासाचा गैरफायदा :शैलेश ठाकरेने आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच उमेशने कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. उमेश खेळण्यासाठी देश विदेशाच्या दौऱ्यावर असतो. त्यामुळे उमेश यादवने त्याचा मित्र शैलेश ठाकरे याला बँकेचे व्यवहारासाठी मॅनेजर म्हणून कामावर ठेवले होते. मात्र, शैलेशने विश्वासाचा गैरफायदा घेत ४४ लाखांचा अपहार केला असल्याचा आरोप उमेश यादवकडून तक्रारीत करण्यात आला आहे.


उमेशच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल : क्रिकेटपटू उमेश यादवने माजी मॅनेजर शैलेश ठाकरे विरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर कोराडी पोलीस ठाण्यात शैलेश ठाकरे विरोधात कलम 406 ,420 भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपुरच्या डीसीपी अश्विनी पटेल यांनी ही माहिती दिली.

उसेन बोल्टचीही अशीच फसवणूक : काही दिवसांपूर्वीच जगातील वेगवान धावपटू उसेन बोल्टची करोडो रुपयांची फसवणूक झाली होती. बोल्टची आयुष्यभराची कमाई काही क्षणात चोरीला गेली. बोल्टच्या खात्यातून तब्बल 98 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती. बोल्टने जमैकामधील एका खासगी गुंतवणूक कंपनीच्या खात्यात हे पैसे ठेवले होते. बोल्टचे हे खाते किंग्स्टन, जमैका स्टॉक्स अॅण्ड सिक्युरिटीज लिमिटेड या खासगी कंपनीत होते. बोल्टने 2012 साली या कंपनीमध्ये खाते सुरु केले होते.

अन्यथा फसवणुकीचा गुन्हा :बोल्टकडे आता केवळ 2 हजार डॉलर्स म्हणजे 1 लाख 62 रुपये शिल्लक राहिले आहेत. पैसे 10 दिवसात मिळवून द्या, अशी मागणी बोल्टने त्या कंपनीकडे केली आहे. वेळेत पैसे दिले नाहीत तर कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करु असा इशारा बोल्टने दिला आहे. उसेने बोल्टने ऑलिम्पिकमध्ये तब्बल 8 गोल्ड मेडल जिंकली आहेत. चीनमध्ये त्याने 100 आणि 200 मीटर शर्यतीत पदकं जिंकली होती. लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने 100, 200 आणि 4X100 मीटर शर्यतीतही सुवर्ण पदक पटकावले होते.

हेही वाचा :Poisoning To Students From Chicken : सहलीत चिकन खाल्ले; जिल्हा परिषद शाळेतील अकरा मुलांना विषबाधा

Last Updated : Jan 21, 2023, 7:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details