नागपूर -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता देशभरात वाद पेटला आहे. भाजपकडून या वक्तव्याचा निषेध होत असताना आता केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari react on nana patole statement ) यांनीही ट्विटद्वारे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र (Union Minister Nitin Gadkari) मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. त्यांनी वापरलेली भाषा निंदनीय असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो
पाकिस्तानच्या सीमेनजिक पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा 20 मिनिटे खोळंबून राहतो. तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री त्याची साधी दखल सुद्धा घेत नाहीत. (Devendra Fadnavis react on nana patole statement) आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष म्हणतात, मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो. काँग्रेस पक्षाचे चालले तरी काय? कधीकाळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला? सत्तेसाठी काहीही? काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे, की दहशत पसरविणारे संघटन? नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही. वैचारिक - बौद्धिक उंची पण असावी लागते!’ असे ट्वीट करत फडणवीस यांनी पटोलेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
आम्ही सगळ्या जिल्हाध्यक्षांना सांगणार आहोत की, आपल्या जिल्ह्यात या विषयावर आक्रमक व्हा
या बाबत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘नेता तैसा कार्यकर्ता, त्यांचे राष्ट्रीय नेते मध्येच गायब होतात, काहीही बोलतात, परिणाम काय होईल, परंपरा काय त्या मोडल्या जातील याची काळजी करत नाहीत. त्यात त्यांचे अध्यक्ष नाना पटोले वेगळे काय करणार? मी त्यांना भ्रमिष्ट म्हणत नाही, पण भ्रमिष्टासारखे त्यांचे वर्तन सुरू आहे. पंजाबमधील घटनेला ते नौटंकी काय म्हणाले, अमित शहांवर त्यांनी आरोप केला की त्यांचाच हा कट आहे. काय बोलतो, काय अर्थ होतो, याचा काही त्यांना पत्ता नाही. भारतीय जनता पार्टी हे सहन करणार नाही. आम्ही सगळ्या जिल्हाध्यक्षांना सांगणार आहोत की, आपल्या जिल्ह्यात या विषयावर आक्रमक व्हा’, असा आदेश चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे.
काँग्रेस पक्ष हा एक वैभवशाली परंपरा असलेला पक्ष आहे
नाना पटोले यांनी केलेले वक्तव्य अतिशय दुर्दैवी आहे. याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. पंतप्रधान हे कुठल्या पक्षाचे नसतात तर, ते देशाचे असतात, त्याचा विसर नाना पटोले यांना पडलेला आहे. नाना पटोले यांनी काँग्रेसची रया घालवली असून त्यांना निवडणुकीत यश भेटत नाही म्हणून हे सर्व सुरू आहे. काँग्रेस पक्ष हा एक वैभवशाली परंपरा असलेला पक्ष आहे. असे असताना जर नाना पटोले असे वक्तव्य करत असतील तर, ते फार दुर्दैवी आहे. याने सातत्याने त्यांचा बालिशपणा उघड होत आहे. याची किंमत नाना पटोले यांना चुकवावी लागेल, असेही दरेकर ( Praveen Darekar react on nana patole statement ) यांनी सांगितले.