महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Traffic Police- Guard Fight Video : नागपूरमध्ये वाहतूक पोलीस आणि हॉटेलच्या सुरक्षा राक्षकात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल - Security guard fights with police

नागपूरच्या सक्करदरा भागातील तिरंगा चौक परिसरात सुरक्षा रक्षक आणि वाहतूक पोलीसांत जोरदार हाणामारी झाली. नो पार्किंगमध्ये गाडी पार्क केल्याच्या कारणावरून ही हाणामारी झाली. तिथे उपस्थित नागरिकांनी संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद ( fight caught in camera ) केली असून त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वायरल झाला आहे.

Traffic police
वाहतूक पोलीस

By

Published : Jul 26, 2022, 5:26 PM IST

नागपूर -नो पार्किंगमध्ये गाडी पार्क( Car parked in no parking ) केल्याच्या वादातून एका हॉटेलच्या सुरक्षा रक्षकाने थेट वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घातली. त्यानंतर दोघांमध्ये हाता-पायी झाल्याची घटना नागपुरच्या सक्करदार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिरंगा चौक परिसरात घडली आहे. या घटेनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे.

Traffic Police And Guard Fight In Nagpur

संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद - नागपूरच्या सक्करदरा भागातील तिरंगा चौक परिसरात असलेल्या हॉटेल बाहेर रोडवर अवैध पद्धतीने दुचाकी पार्क करण्यात आल्या होत्या. वाहतूक पोलीस टोइंग व्हॅनच्या मदतीने गाडी उचलत असताना सुरक्षा रक्षकाने त्याला विरोध केला. सुरक्षा रक्षकाने पोलीस कर्मचाऱ्यांसोबत जोरदार वाद घातला. बघता-बघता प्रकरण हातापायीवर आले ( Security guard fights with police ). तिथे उपस्थित नागरिकांनी संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद ( fight caught in camera ) केली असून त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वायरल झाला आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांने दिले प्रतिउत्तर -हॉटेलच्या सुरक्षा राक्षकाने वाहतूक पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्याचे काम करण्यापासून मज्जाव केला. एवढेचं नाही तर तो वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेला. तेव्हा वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने देखील त्या सुरक्षा राक्षकाला प्रतिउत्तर दिल्याचे व्हिडीओमध्ये रेकॉर्ड झाले आहे.

हेही वाचा -Gujarat hooch tragedy : गुजरातमध्ये विषारी दारुमुळे 28 जणांचा मृत्यू, 50 जण रुग्णालयात

ABOUT THE AUTHOR

...view details