महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कौटुंबिक वादातून बापाने केला दोन वर्षीय चिमुकलीचा गळा चिरून खून

मुलीचा खून केल्यानंतर आरोपी किशोर सयाम याने देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती पुढे आली आहे. एमआयडीसी बुटीबोरी पोलिसांनी नराधम बाप किशोर सयामवर खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. मात्र आरोपी हा जखमी असल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नागपूर
नागपूर

By

Published : Mar 2, 2021, 10:16 PM IST

नागपूर- जिल्ह्यातील बुटीबोरी येथील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका निर्दयी वडिलाने स्वतःच्या दोन वर्षीय चिमुकलीचा ब्लेडने गळा चिरून खून केल्याची संतापजनक घटना घडली आहे. राधिका किशोर सयाम असे त्या मृत दुर्दैवी चिमुकलीचे नाव आहे. मुलीचा खून केल्यानंतर आरोपी किशोर सयाम याने देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती पुढे आली आहे. एमआयडीसी बुटीबोरी पोलिसांनी नराधम बाप किशोर सयामवर खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. मात्र आरोपी हा जखमी असल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार किशोर सयाम हा चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील उमरवाही येथील रहिवासी आहे. तो कामाच्या निमित्ताने बुटीबोरी परिसरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशपूर येथे पत्नी पूजा आणि दोन वर्षीय चिमुकली राधिकाला घेऊन भाड्याने राहत होता. गेल्या काही दिवसांपासून किशोरला दारूचे व्यसन जडले होते, त्यातच तो बायकोच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करू लागला होता. काल सकाळपासूनच किशोर दारूच्या नशेत झिंगला होता. त्याने बायकोला मारहाण केल्यामुळे ती किशोरची तक्रार देण्यासाठी एमआयडीसी बुटीबोरी पोलीस ठाण्यात गेली होती. मात्र, रात्री जेव्हा ती घरी परत आली तेव्हा दोन वर्षांची मुलगी राधिका रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडलेली होती. पूजाने लागलीच घटनेची माहिती शेजाऱ्यांना दिली. पोलिसांच्या मदतीने राधिकाला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

आरोपी बापाने केला आत्महत्येचा प्रयत्न -

मुलीचा खून केल्यानंतर आरोपी किशोरने स्वतःवरसुद्धा ब्लेडने वार केले, ज्यामुळे तो जखमी झाला होता. ज्यावेळी पूजा घरी पोहचली होती तेव्हा मुलगी राधिका आणि पती किशोर जखमी अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी किशोरला पुढील उपचारासाठी नागपूरला दाखल केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details