नागपूर - परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नष्ट झालेली पिके घेऊन शेतकरी आणि विदर्भवादी कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला जात होते. मात्र, पोलिसांनी त्यांना वाटेतच अडवले. यावेळी शेतकरी आणि विदर्भवादी कार्यकर्त्यांनी सोबत आणलेला खराब माल रस्त्यावर टाकून जोरदार घोषणाबाजी केली.
जिल्हाधिकाऱ्यांना परतीच्या पावसाचे नुकसान दाखवायला गेलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
नष्ट झालेली पिके घेऊन शेतकरी आणि विदर्भवादी कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला जात होते. मात्र, पोलिसांनी त्यांना वाटेतच अडवले. यावेळी शेतकरी आणि विदर्भवादी कार्यकर्त्यांनी सोबत आणलेला खराब माल रस्त्यावर टाकून जोरदार घोषणाबाजी केली.
विदर्भ आंदोलन समितीच्या पुढाकाराने शहराच्या आकाशवाणी चौकातून शेतकरी, विदर्भवादी नेते व कार्यकर्ते हातात वाया गेलेले कापसाचे पीक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात होते. मात्र, पोलिसांकडून शेतकऱ्यांना वाटेतच अडविण्यात आले. शेतकरी आंदोलन करत होते. मात्र, त्यांच्याकडे आंदोलनाची परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांना व कार्यकर्त्यांना थांबविले. मात्र शेतकरी व कार्यकर्ते दोघेही ऐकत नसल्याने पोलिसांनी त्यांच्यापैकी अनेकांना ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर वाद अधिकच वाढला. यावेळी विदर्भवादी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. या दरम्यान, शेतकरी आणि विदर्भवादी कार्यकर्त्यांनी सोबत आणलेला खराब माल रस्त्यावर टाकला आणि जोरदार घोषणाबाजी केली.
हेही वाचा-सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवतांची भेट