महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा नाही - देवेंद्र फडणवीस - देवंद्र फडणवीस कर्ज माफी टीका

अतिवृष्टीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमाफीच्या घोषणेचा फायदा होणार नाही. सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अशी टीका भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

nagpur
देवेंद्र फडणवीस

By

Published : Dec 21, 2019, 5:49 PM IST

नागपूर- सरकारने २५ हजार रुपये प्रतिएकर कर्जमाफी देण्याचे सांगितले होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. राष्ट्रपतींनी जी मदत दिली होती. त्याच्या व्यतिरिक्त चालू सरकारने कुठलीही मदत दिली नाही. शासनाने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता २ लाखांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. कर्जमाफी कधी करणार याबद्दलही शासनाने सांगितले नाही. अतिवृष्टीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना या घोषणेचा फायदा होणार नाही. त्याचबरोबर, सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून विदर्भासाठी कुठलीही नवीन घोषणा केली नाही. उलट आम्ही केलेल्या घोषणाच सरकारने पुन्हा केल्या, अशी टीका भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details