नागपूर:नागपूर जिल्ह्यात मागील दोन- तीन दिवसात अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. पण हा पाऊस जिल्ह्यातील (District) सर्वच भागात झाला नाही. तसेच काही भागात पाऊस झाला तर काही भागात अजून देखील पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी (Farmers) पेरणी करण्यासाठी घाई करू नये. सरासरी 75 ते 100 मिमी. पाऊस (Rain) त्या परिसरात होत नाही, तोपर्यंत पावसाची प्रतीक्षा करण्याचा सल्ला नागपुरचे (Nagpur) कृषी अधीक्षक यांच्याकडून दिला जात आहे. तेच 20 जून दिवशी नागपुर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. पण हा पेरणी करण्याऐवढा नाही. त्यामुळे अजूनही काही भागात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा बळीराजा करत आहे.
नागपुर जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर यासह इतर पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. नागपूर जिल्ह्यात कापसाचा पेरा यंदाच्या वर्षात साधारणता 2 लाख 11 हजार हेक्टरवर अपेक्षित आहे. तेच सोयाबीनचा पेरा हा 93 हजार हेक्टरवर अपेक्षित आहे. तूरिचा पेरा हा 64 हजार हेक्टरवर शेतकऱ्यांकडून पेरणी होईल, असे नियोजन कृषी विभागाचे आहे. या अनुषंगाने नागपूर जिल्हयात शासनाकडून खतांचा पुरवठा उपलब्ध करून दिला आहे.
नागपूर जिल्ह्याच्या उमरेड, भिवापूर, काटोल सावनेर या तालुक्यातील काही भागात पाऊस झालेला आहे. त्यामुळे या परिसरातील काही ठिकाणी जिथे शेतकऱ्यांना समाधानकारक पाऊस झाला किंवा पावसाचा खंड पडल्यास पाण्याची व्यवस्था असेल, अशा शेतकऱ्यांनी लागवडीसाठी नियोजन करावे. साधारणतः 35 हजार हेक्टरच्या घरात नागपुर जिल्ह्यातील काही भागात पेरणी केल्याची प्राथमिक माहिती असल्याचे कृषी अधीक्षक मिलिंद शेंडे यांनी ई- टीव्हीशी बोलतांना सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाऊस होत नाही, तोपर्यंत पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे. जिल्ह्यातील सर्वदूर भागात अजूनही जमिनीची तहान भागेल अश्या पावसाची प्रतीक्षा पेरणीसाठी आहे.
विदर्भात पुढील पाच दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता..
मागील दोन तीन दिवसात पाऊस झाला आहे. पंरतु, यात पाऊस झाला नाही, अशी चिंता करण्याचे काही कारण नाही. दक्षिण पश्चिमकडून येणाऱ्या हवेचा दाब होत असल्याने अल्प पाऊस काही प्रमाणात येत आहे. दरवर्षी होणाऱ्या सामान्य पावसाच्या सरासरीच्या तुलनेत झालेला पाऊस हा कमी आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात बंगलाच्या खाडीमध्ये हवामानाचे प्रेशर तयार झाल्यास ही पावसाच्या सरासरीची तूट भरून निघू शकते. त्यामुळे काही भागात जरी पाऊस हा समाधानकारक झाला असल्यास पेरणी होऊ शकणार आहे. पण ज्या भागात पाऊस होणार नाही त्यांनी किमान एक आठवडा तरी पावसाची प्रतीक्षा करावी, असा सल्ला हवामान विभागाकडून दिला जात आहे. यात पुढील पाच दिवसात विदर्भात सर्वत्र जोरदार नसला तर मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील, अशी माहिती हवामान विभागाचे दिली आहे.
हेही वाचा-Chandrakant Patil visit Ambabai Temple : एकनाथ शिंदे यांनी लिहिलेल्या पत्रापासून मी अनभिज्ञ : चंद्रकांत पाटील