महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकरी दादा 'वेट अॅण्ड वॉच'च्या भूमिकेत; पावसाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत बियाणे खरेदीकडे पाठ

मृग नक्षत्राला आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र, पावसाच्या आगमनाला विलंब झाल्याने शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लागलेला आहे. मान्सूनचा विलंब होत असल्याने शेतकऱ्यांनी अद्यापही बी-बियाणे आणि खत खरेदीला सुरुवात केलेली नाही. मागील दोन दिवसांपासून आकाशात ढग दाटून येत आहेत. तुरळक पाऊस देखील होत आहे. मात्र, ते पावसाळी ढग नसल्याने शेतकरी राजा अस्वस्थ झाला आहे.

पावसाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत बियाणे खरेदीकडे पाठ

By

Published : Jun 7, 2019, 3:34 PM IST

नागपूर- मृग नक्षत्राला आजपासून सुरुवात झाली आहे. परंतु, तरीही एवढ्यात मान्सूनचा पाऊस येईल, अशी आशा वाटत नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. पावसाचे आगमन लांबणीवर गेल्याने शेतकरी बी-बियाणे खरेदी करण्याचीदेखील घाई करत नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाच्या सरी २० तारखेला कोसळणार आहेत. त्यामुळे शेतकरी दादा 'वेट अॅण्ड वॉच' च्या भूमिकेत आहे.

पावसाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांचे बियाणे खरेदीकडे पाठ

मृग नक्षत्राला आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र, पावसाच्या आगमनाला विलंब झाल्याने शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लागलेला आहे. मान्सूनचा विलंब होत असल्याने शेतकऱ्यांनी अद्यापही बी-बियाणे आणि खत खरेदीला सुरुवात केलेली नाही. मागील दोन दिवसांपासून आकाशात ढग दाटून येत आहेत. तुरळक पाऊस देखील होत आहे. मात्र, ते पावसाळी ढग नसल्याने शेतकरी राजा अस्वस्थ झाला आहे.

मृग नक्षत्रात सर्वाधिक प्रमाणात पिकांची पेरणी केली जाते. या नक्षत्रात पेरणी फायद्याची असल्यानेच बळीराजा या काळतच पेरणीला सर्वाधिक प्राधान्य देतो. त्याकरिता बी-बियाणे आणि खतांच्या खरेदीची लगबग मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच सुरू होते. मात्र, यावर्षी मान्सूनचे आगमन लांबणीवर गेल्याने शेतकरी वर्ग सावध भूमिकेत आहे. मृग नक्षत्रात केलेली पेरणी पावसाअभावी वाया गेल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती सर्वाधिक आहे. त्यामुळेच बळीराजाची पावसाच्या आगमनानंतच पेरणी करण्याची मनस्थिती असल्याने अजूनही कृषी केंद्रांवर पाहिजे तशी गर्दी दिसून येत नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details