नागपूर - नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील किन्ही गावात एक वृद्ध शेतकऱ्याने स्वत:चे सरण रचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Farmer suicide In Nagpur ) आत्माराम मोतीराम ठवकर असे आत्महत्या करणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. या आत्महत्येनंतर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेबाबत कुटुंबीयांनी यावर काही बोलण्यास नकार दिला आहे.
स्वत: उडी घेत आत्महत्या केली
मृत आत्माराम ठवकर यांनी मृत्यूच्या रात्री गावात मंडईनिमित्त आयोजित नाटकाचा रात्रभर आनंद घेतला. पहाटे गावातील मंदिरात पूजा-अर्चा करून ते शेताकडे आले. शेतातील लाकडे गोळा करून सरण रचले. त्यामध्ये स्वत: उडी घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर आत्माराम ठवकर यांच्या मुलासह नातेवाइकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर वेलतूर पोलीसांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घडलेल्या घटनेची पाहाणी केली.