नागपूर : आपल्याला देश आणि शेतकरी वाचवायचे असतील तर सरकारच्या विरोधात लढा द्यावा लागेल. आपल्याला आंदोलन सोडायचे नाही. आंदोलना शिवाय पर्याय नाही असे टिकेत यांनी सांगितले. महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन कमकुवत जरी दिसते असले तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन मजबूत करण्यास केव्हाही बोलवा आम्ही येऊ असे टिकैत म्हणाले. शेतकऱ्यांनी संघटित होऊन संघर्ष करण्याचे आवाहन त्यांनी केले.
नागपूरच्या इशाऱ्यांवर चालते सरकार :सरकार शेतकरी आंदोलन चिरडून टाकण्याचे कारस्थान नागपुरातून रचण्यात आले अशी टीका टिकेत यांनी केली. लोकांची विचारसरणी बदण्याचे काम केले जाते आह. 40 टक्के लोकांना शेतापासून दूर करण्याचा विचार या सरकारचा आहे. स्वस्त लेबर मिळावे म्हणून लेबर ऍक्ट मध्ये बदल केले. अनेक कायद्यात संशोधन केले जात आहे. शेतकऱ्यांची जमीन मोठ्या उद्योगपतीना जमिनी देण्याचा षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप राकेश टिकेत यांनी केला आहे. भारतात अन्न धान्य उत्पादित होऊ नये यासाठी मोठ्या कंपनी कार्यरत आहे. हा देश कृषी आणि ऋषींचा आहे, कृषी सोबत छेडखाणी कराल तर आंदोलन होणारच, देश आंदोलनाने वाचेल, राजकीय पक्ष तर विकायचा बसला आहे. त्यासाठी संघर्ष करावा लागेल असे देखील ते म्हणाले