नागपूर - शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी सुमारे एक महिनाच शिल्लक आहे. पावसाळा सुरू झाल्यावर कापूस विक्री करणे शेतकऱ्यांना शक्य होणार नाही. त्यामुळे कोरोनाच्या या संकटात राज्य सरकारने नाफेड व सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) च्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करावा, अशी मागणी शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केली आहे. याबाबतचे एक पत्र जावंधिया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.
सरकारने तात्काळ कापूस खरेदी सुरू करावी - विजय जावंदिया - nagpur news cotton
कोरोनाच्या या संकटात राज्य सरकारने नाफेड व सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) च्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करावा, अशी मागणी शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केली आहे. याबाबतचे एक पत्र जावंधिया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.
कोरोनाच्या उद्रेकानंतर जागतिक बाजारपेठेत कापसाच्या दरात मंदी आली आहे. गेल्या वर्षी 5 हजार 400 हमीभावापेक्षा शेतकऱ्यांना बाजारात जास्त भाव मिळाला होता. मात्र, यंदा कुठलाही व्यापारी साडेचार हजारापेक्षा जास्त भाव देऊ शकत नाही. २००८ मध्ये हमीभाव निश्चित करून नाफेड व सीसीआयमार्फत कापूस खरेदी सुरू करण्यात आली होती. सध्या तापमानात वाढ होत आहे. पेट घेऊन कापूस नष्ट होऊ शकतो. म्हणून कापसाची युद्धपातळीवर खरेदी करण्याची गरज असल्याचे जावंधिया म्हणाले.
कापूस खरेदीसाठी राज्य सरकारने जास्त केंद्र सुरू करण्याची मागणी जावंधिया यांनी केली. यासोबतच इतर राज्यांनी शेतमाल विकत घेण्यासाठी ज्या योजना राबवल्या तशाच योजना महाराष्ट्र सरकारने देखील सुरू कराव्यात, अशीही मागणी जावंधिया यांनी केली.