महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'खिंडशी जलाशयाची पातळी कमी करा'... शेतकऱ्यांचा जलसमाधी घेण्याचा प्रयत्न

खिंडशी जलाशयाची पातळी कमी करण्याच्या मागणीसाठी आज शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. रामटेक तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वतःजवळ साठवलेले पैसे आणि उसनवारी करून खिंडसी तलावाकाठची जमीन तात्पुरत्या स्वरुपात शेतीसाठी लिलावात घेतली.

protest in nagpur
'खिंडशी जलाशयाची पातळी कमी करा'... शेतकऱ्यांचा जलसमाधी घेण्याचा प्रयत्न

By

Published : Nov 2, 2020, 10:49 PM IST

नागपूर -खिंडशी जलाशयाची पातळी कमी करण्याच्या मागणीसाठी आज शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. रामटेक तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वतःजवळ साठवलेले पैसे आणि उसनवारी करून खिंडसी तलावाकाठची जमीन तात्पुरत्या स्वरुपात शेतीसाठी लिलावात घेतली.

'खिंडशी जलाशयाची पातळी कमी करा'... शेतकऱ्यांचा जलसमाधी घेण्याचा प्रयत्न

मात्र, तलावाच्या पाण्याची पातळी जास्त असल्याने संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवलंय. या संदर्भात पाटबंधारे विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करून देखील उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी केलेल्या मध्यस्तीने या शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे.

नागपूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या खिंडसी तलावाच्या शेजारील हजारो एकर जागा दरवर्षी शेतकऱ्यांना भाडे तत्त्वावर देण्यात येते. यावर्षी जून महिन्यात जमिनींचा लिलाव झाला. मात्र त्यानंतर निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे आणि तलावाच्या पाण्याची पातळी अधिक असल्याने या शेतकऱ्यांची सर्व जमीन पाण्याखाली गेली आहे. पेरलेले सर्व पाण्याखाली गेल्याने या शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागले. जवळपास ५०० शेतकरी या ठिकाणी शेती करतात.

प्रशासनाने तात्काळ खिंडसी तलावातील उपलब्ध साठ्याची पातळी कमी करून शेती करण्यास जागा मोकळी करून द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय.आजच्या स्थितीत तलावातील पाण्याची पातळी १०२५ सिएलआर क्षमतेवर कायम ठेवणे आवश्यक होते. मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांना मिळालेली शेतजमीन पाण्यात बुडाली असल्याने पीक नष्ट झाले आहे.

इंग्रजांच्या काळापासून सुरू आहे परंपरा

खिंडसी तलावातील जलसाठ्याव्यतिरिक्त २७०० एकर जमीन परिसरातील शेतकऱ्यांना खिंडसी तलाव प्रशासनाकडून दरवर्षी जून महिन्याला लिलाव पद्धतीने दिली जाते. महत्त्वाचे म्हणजे गेल्या अनेक दशकांपासून ही परंपरा आजही सुरू आहे. यावर्षी ही परंपरा खंडित होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र प्रशासनाने ऐन कोरोना काळात ही प्रक्रिया पार पाडली.

ABOUT THE AUTHOR

...view details