महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Vishnu Manohar : विष्णू मनोहर यांचा १५ वा विश्व विक्रम; ५ हजार किलोची बनवली भाजी - Chef Vishnu Manohar 15th World Record

विष्णू मनोहर यांनी १५ वा विश्व विक्रम केला ( Chef Vishnu Manohar 15th World Record ) आहे. त्यांनी ५ हजार किलोची भाजी बनवली आहे. बी. आर. ए. मुंडले हायस्कूलच्या मुलांसोबत त्यांनी ही विश्व विक्रम ( Vishnu Manohar Cook 5 Thousand KG Mix Veg ) केला.

Vishnu Manohar 15th world record
विष्णू मनोहर यांचा १५ वा विश्व विक्रम

By

Published : Dec 25, 2022, 7:16 PM IST

विष्णू मनोहर ५ हजार किलोची भाजी

नागपूर :प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सलग १५ व्या विश्व विक्रमाला गवसणी घातली ( Chef Vishnu Manohar 15th World Record ) आहे. मात्र, यावेळचा विक्रम जरा खास आहे त्याच कारण म्हणजे हा विक्रम करताना त्यांना शाळकरी विद्यार्थ्यांची साथ लागली आहे. त्यांनी बाराशे मुलांसोबत लाभले ५ हजार किलोंची भाजी तयार केली ( Vishnu Manohar Cook 5 Thousand KG Mix Veg ) आहे. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती आणि ख्रिसमस निमित्ताने विष्णू मनोहर यांनी बी. आर. ए. मुंडले हायस्कूलच्या मुलांसोबत ५ हजार किलोंची भाजी तयार केली आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ( Nitin Gadkari Attendance ) देखील हजेरी लावली होती.

५ हजार किलोची भाजी

नवनवीन रेकॉर्ड करण्याची ओळख : प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर दरवेळी नवनवीन रेकॉर्ड करण्यासाठी ओळखले जातात. गेल्या दोन महिन्यांपूर्वी त्यांनी दोन हजार किलोचा चिवडा तयार केला होता. त्यानंतर त्यांनी आज तब्बल पाच हजार किलोची भाजी तयार केली आहे. भाजी निवडणे, चिरणे आणि स्वच्छ करणे ही कामे विद्यार्थ्यांनी केली. तर भल्या मोठ्या कढईत फोडणी देण्याचे काम विष्णू मनोहर यांनी केले आहे.

काल पासून भाजी कापण्याचे काम : एकाच वेळी पाच हजार किलोच्या भाजीला फोडणी देण्यासाठी काल पासून मुलांनी भाजी चिरून,कापून ठेवली. आज सकाळी प्रत्यक्ष भाजी तयार करण्याला सुरूवात झाली.

5 हजार किलोच्या भाजीचे साहित्य : 5 हजार किलोची भाजी तयार करण्यासाठी कांदे ३३० किलो, लसुण, आलं व बटाटे प्रत्येकी ६६.१ किलो, गाजर ३३० किलो, फुलकोबी ६६१ किलो, पनीर ३३०.५ किलो, टोमॅटो ६६१ किलो, मटार ३३०.५ किलो, सांभार १३२.२ किलो, तिखट ५२.८८ किलो, हळद ३३.०५ किलो, धने पावडर ३९.६६ किलो, मीठ ३३.०५ किलो, साखर १३.२२ किलाे, तेल ३९६.६ किलो असे एकूण ४१३७.८६ जिन्नस लागले आहे. तयार भाजीचे वजन ४९९७.१६ किलो इतके होते. ही भाजी खवय्यांना वितरीत करण्यात आली.

दोन हजार किलोचा चिवडा : विष्णू मनोहर यांनी जागतिक खाद्यान्न दिनी दोन हजार किलो महाचिवडा तयार केला होता. सहा हजार किलोच्या अवाढव्य कढईत चिवडा तयार करून त्याचे मोफत वितरण करण्यात आले होते.

विश्वविक्रमी विष्णू : गणेशोत्सवात विष्णू मनोहर यांनी नागपुरातच २५०० किलो सातळलेल्या डाळीचा प्रसाद केला होता. ५ फूट लांब आणि ५ फूट रुंद असा "सर्वात लांब पराठा' तयार करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. तीन तासात ७००० किलोची महा मिसळ तयार करण्याचा विश्वविक्रम मनोहर यांच्या नावावर आहे. मनोहर यांनी २० डिसेंबर २०१८ रोजी भारतात ३२०० किलो वांग्याचे भरीत (बैंगण भरता/वांगी) तयार करून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्यांनी ३००० किलो खिचडी तयार करीत नवा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. नंतर ५००० किलो खिचडी शिजवून त्यांनी स्वतःचाच विक्रम मोडला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details