महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Family Dispute Crime : कौटुंबिक वादातून नागपुरात नवऱ्यानं केली बायकोची हत्या; तर बी़डमध्ये बापानं मुलावर अन् पत्नीवर केले वार - घरगूती वादातून बायकोची हत्या

Family Dispute Crime : कौटुंबिक वादातून नागपूरात नवऱ्यानं आपल्या बायकोची हत्या केल्याचं समोर आलंय. तर बीडमध्ये बापानेच आपल्या पत्नी व मुलावर प्राणघातक हल्ला केल्याचं समोर आलंय.

Family Dispute Crime
Family Dispute Crime

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2023, 6:59 AM IST

नागपूर/ बीड Family Dispute Crime : राज्यात दिवसेंदिवस कौटुंबिक वादातून होणाऱ्या गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. नागपूर आणि बीडमध्ये अशा दोन घटना समोर आल्या असून नागपूरात नवऱ्याने घरगूती वादातून बायकोची हत्या केलीय, तर बीडमध्ये बापानेच आपल्या पत्नी व मुलावर प्राणघातक हल्ला केल्याचं समोर आलंय.


कौटुंबिक वादातून बायकोची हत्या :पहिल्या घटनेत नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणातून रागाच्या भरात आपल्या पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आलीय. रंजना मनोहर मनघटे (५०) असं हत्या झालेल्या महिलेचं नावं आहे. मृत रंजना मनोहर मनघटे या पतीसोबत काही वर्षांपासून वारेगाव येथे राहत होत्या. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. मोलमजुरी करून त्यांनी भानेगाव येथे स्वतःचं घर बांधलं होतं. मृतक रंजनाने मुलगा आनंदला औषध आणण्यासाठी घराबाहेर पाठवले होतं. त्यानंतर घरात दोघेच पती-पत्नी होते. तेवढ्यात त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला. हा वाद फारच विकोपाला गेल्यानं आरोपी मनोहरनं रंजनाची हत्या केली. विशेष म्हणजे रंजनाची हत्या केल्यानंतर आरोपी मनोहरनं स्वतः खापरखेडा पोलीस स्टेशनला जाऊन केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. ( Nagpur Crime News )

बायको व मुलावर धारदार शस्त्राने वार : दुसऱ्या घटनेत बीडच्या आंबेजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या सुगाव येथील नरसिंह पवार यांनी स्वतःच्या मुलावर व पत्नीवर धारादर शस्त्राने वार करून स्वतः आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडलीय. नरसिंग रानबा पवार ( वय 55, रा. सुगाव,ता. अंबाजोगाई ) असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. नरसिंग पवार हे मागील काही दिवसांपासून वेड्यासारखं करत होते. त्यांच्या मुलांनी त्यांच्या दवाखान्यासाठी 7 ते 8 लाख रुपये खर्च केले होते. ते वारकरी संप्रदायातील होते. काल नेहमीप्रमाणे सर्व जण घरी झोपले असताना नरसिंग पवार यांनी मुलगा व्यंकटेश पवार (वय 28) आणि बायकोवर धारदार शस्त्राने वार केले, यात व्यंकटेश याच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली असून बायको किरकोळ जखमी झालीय. या दोन्ही माय लेकरावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान बायको व मुलावर वार केल्यानंतर घरी कोणी नसल्याने नरसिंग पवार यांनी घरातच आत्महत्या केलीय. नरसिंग पवार यांचे शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान मुलावर आणि बायकोवर हल्ला का केला याची माहिती समोर आलेली नाही. या घटनेची माहिती मिळताच बर्दापूर पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केलाय. ( Beed Crime News )

हेही वाचा :

  1. Palghar Crime : जावेचा गर्भपात अन् सासूला संपवण्यासाठी महिलेची अनोखी शक्कल; 'असा' झाला खुलासा
  2. father threw two children : नशेच्या आहारी गेलेल्या बापाने दोन मुलांना ढकलले विहिरीत, एक बचावला दुसऱ्याचा मृत्यू
  3. CCTV Video : कौटुंबिक वादातून एकाचा पायच छाटला; मालेगावातील घटना

ABOUT THE AUTHOR

...view details