नागपूर- नागपूर शहरातील मुख्य रेल्वे स्थानक कंपाऊंड परिसरातून सुरक्षा पोलिसांनी एक बॅग जप्त जप्त केली आहे. बॅगमध्ये छोट्या आकाराच्या डीटोनेटरने (जिवंत स्फोटके) आढळून आले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. जप्त करण्यात आलेले डीटोनेटरने खाण (मायनिंग) मध्ये ब्लास्ट करण्याच्या कामात येतात. बॅगमध्ये जिवंत स्फोटके असल्याचे निष्पन्न होताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. बीडीडीएस पथकाने स्फोटके भरलेली बॅग ताब्यात घेऊन ती सुरक्षित ठिकाणी हलवली आहे.
नागपूर रेल्वे स्थानक परिसरात बॅगमध्ये आढळली जिवंत स्फोटके - जिवंत स्फोटके
लोहमार्ग पोलीस ठाण्याचे कर्मचारी संदीप तुमडाम यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक काळ्या रंगाचा बॅग दिसली. संदीप यांनी त्या बॅगची तपासणी केली असता बॅगमध्ये एका डीटोनेटरला 54 जिलेटिनच्या कांड्या वायरने जोडण्यात आल्या असल्याचे दिसताच याबाबत लोहमार्ग पोलीस विभागातील वरिष्ठांना सूचना देण्यात आली. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहेत.
जिवंत स्फोटके
घातपाताचा प्रयत्न तर नाही? -लोहमार्ग पोलीस ठाण्याचे कर्मचारी संदीप तुमडाम यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक काळ्या रंगाचा बॅग दिसली. संदीप यांनी त्या बॅगची तपासणी केली असता बॅगमध्ये एका डीटोनेटरला 54 जिलेटिनच्या कांड्या वायरने जोडण्यात आल्या असल्याचे दिसताच याबाबत लोहमार्ग पोलीस विभागातील वरिष्ठांना सूचना देण्यात आली. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहेत.
हेही वाचा -पंजाब: मोहालीत इंटेलिजन्स ब्युरोच्या कार्यालयाबाहेर स्फोट