महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अबब...! हे पाण्याचे नाही तर चक्क दारूचे तळे - chemical

अवैध गुळाची तस्करी उघड करण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकालाही ही 'योजना' पाहून आश्चर्य वाटले. काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातून येणारा काळा गुळ जप्त करण्यात आला आहे.

हे पाण्याचे नाही तर चक्क दारूचे तळे

By

Published : Mar 30, 2019, 7:11 PM IST

नागपूर - वनविभागांतर्गत वनपरिक्षेत्रात पाण तळ्यांची योजना आहे आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी सरकारने शेततळ्याची योजना आखली. मात्र, मद्यतस्करांनी तर त्याही पलीकडची शक्कल लढवली आहे. दारू भट्टी नाही तर चक्क दारूचे तळे निर्माण केले आहे. नागपूरच्या भिवसनखोरी भागात हा विचित्र प्रकार उघडकीस आला आहे.

हे पाण्याचे नाही तर चक्क दारूचे तळे


अवैध गुळाची तस्करी उघड करण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकालाही ही 'योजना' पाहून आश्चर्य वाटले. काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातून येणारा काळा गुळ जप्त करण्यात आला आहे. हा गुळ नागपूरजवळील भिवसनखोरी परिसरात दारूच्या निर्मितीसाठी हातभट्टी आणला जात होता. कारवाई होऊनही तस्करांनी अवैध गुळाची निर्यात थांबवली नाही. त्या गुळात घातक रसायनांचा वपार करून मद्य बनविला जात आहे. रसायनयुक्त या मद्य प्राशनामुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली.

ABOUT THE AUTHOR

...view details