महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मध्य प्रदेशातून दारू तस्करी करणारी महिला उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात - अवैध दारू तस्करी

मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रात अवैध मार्गाने दारू तस्करी करणाऱ्या एका महिला तस्कराला उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले आहे. आरोपी महिलेकडून एकूण ६ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अवैध मार्गाने दारू तस्करी करणाऱ्या एका महिला तस्काराला उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले आहे. आरोपी महिलेकडून एकूण ६ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

By

Published : Aug 6, 2019, 8:52 PM IST

नागपूर - राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूची तस्करी करणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेतले आहे. या महिलेकडून मध्यप्रदेशातील दारू जप्त केली आहे. मध्यप्रदेशमधून दारुबंद चंद्रपूर जिल्ह्यात ही दारू तस्करी केली जात होती.

अवैध मार्गाने दारू तस्करी करणाऱ्या एका महिला तस्काराला उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले आहे. आरोपी महिलेकडून एकूण ६ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रेणुका गब्बर जाट (वय, ४२वर्षे) असे ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे. नागपूरच्या सावनेर भागात ही कारवाई करण्यात आली आहे. १८० मी.लिटरच्या एकूण २०० बाटल्या महिलेकडून जप्त करण्यात आल्या. दारू तस्करीसाठी वापरलेली ट्रॅव्हल्स बस देखील उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतली आहे. मध्य प्रदेशातून दारू तस्करी करणाऱ्या टोळीमध्ये आणखी ४ महिलांचा समावेश असून, त्या देखील याच पद्धतीने तस्करी करीत असल्याची माहिती आरोपी महिलेने दिली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण ६ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. महिलेसह बसच्या वाहक आणि चालकाला देखील ताब्यात घेतल्याची माहिती दुय्यम निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details