महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत एकही आरोप नाही - देशमुख

सचिन वाझे आणि मुंबइचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर चुका केल्या होत्या. त्या चुका माफ करण्यासारख्या नव्हत्या. यामुळे त्यांची मुंबई आयुक्त पदावरुन बदली केली होती. तसेच एका कार्यक्रमात या संदर्भातचे जाहीर वक्तव्य सुध्दा केले होते. त्यानंतर बदली केल्यानंतर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

ex maharashtra home minister anil deshmukh on parambir singh in nagpur
तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत एकही आरोप नाही - देशमुख

By

Published : May 4, 2021, 9:01 PM IST

नागपूर - दररोज परमबीर सिंग यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे नवनविन आरोप समोर येत आहेत. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीन ठेवण्याचे प्रकरण तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद होती. यामुळे त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर त्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत. माझ्या मागील तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत एकही आरोप झालेला नाही, असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सांगितलं. ते नागपुरात बोलत होते.

अनिल देशमुख बोलताना...
सचिन वाझे आणि मुंबइचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर चुका केल्या होत्या. त्या चुका माफ करण्यासारख्या नव्हत्या. त्या अक्षम्य अशा चुका होत्या. यामुळे त्यांचा तपास एनआयए करीत आहे. यामुळे त्यांची मुंबई आयुक्त पदावरुन बदली केली होती. तसेच एका कार्यक्रमात या संदर्भातचे जाहीर वक्तव्य सुध्दा केले होते. त्यानंतर बदली केल्यानंतर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केल्याचे अनिल देशमुख म्हणाले.

माझ्या ३० वर्षाच्या राजकीय जीवनात एक सुध्दा आरोप नाही. परमबीर सिंग यांच्या खोटया आरोपावरुन माझ्यावर जो सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे, त्यावर न्याय मागण्यासाठी मी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. विशेष म्हणजे परमबीर सिंह जेव्हा पदावर होते, तेव्हा त्यांनी कुठलेच आरोप किंवा घडलेल्या प्रकरणाबद्दल भाष्य केलेले नाही. त्यांना पदावरून जेव्हा दूर करण्यात आले, त्याच्यानंतर त्यांनी आरोप करणे सुरू केले, असे देखील देशमुख यांनी सांगितलं. दरम्यान, रश्मी शुक्ला यांच्याविषयी प्रश्न विचारल्यानंतर अनिल देशमुख यांनी उत्तर देणं टाळलं.

ABOUT THE AUTHOR

...view details