महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ash Slurry Dumping Issue : नांदगावच्या बेकायदेशीर राख प्रकरणात पर्यावरण मंत्र्यांचा हस्तक्षेप, एनजीओच्या प्रयत्नांना यश - Ash Slurry Dumping Issue

खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र पूर्वी टाकत असलेल्या डम्पिंग ग्राउंडवर जागा ( dumping of ash slurry by Khaperkheda thermal ) शिल्लक नाही. त्यामुळे यंत्रणेकडून नांदगाव येथे राख टाकायला सुरवात केली. यासाठी खापरखेडा विद्युत प्रकल्पापासून 16 किलोमीटर अंतरावर नांदगाव डम्पिंग ग्राउंडपर्यंत ( Nandgaon villagers oppose to Khaparkheda thermal ) पाईपलाईन टाकली आहे.

लीना बुधे
लीना बुधे

By

Published : Feb 8, 2022, 8:12 PM IST

Updated : Feb 8, 2022, 8:29 PM IST

नागपूर - नागपूरच्या खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राच्यावतीने नव्याने सुरू झालेल्या युनिटमधील कोळशाची राख नांदगाव येथील डम्पिंग ग्राऊंडवर बेकायदेशीररित्या टाकण्यात ( Nandgaon ash slurry dumping issue ) येत आहे. याविषयीची तक्रार गावकरी आणि एनजीओने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Nandgaon villagers complaint to Aditya Thackeray ) यांना केली आहे. याची दखल घेत आदित्य ठाकरे यांनी प्रदूषण मंडळाला कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही दखल घेत संबंधित यंत्रणेला कारवाईचे आदेश दिले आहेत.



खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र पूर्वी टाकत असलेल्या डम्पिंग ग्राउंडवर जागा ( dumping of ash slurry by Khaperkheda thermal ) शिल्लक नाही. त्यामुळे यंत्रणेकडून नांदगाव येथे राख टाकायला सुरवात केली. यासाठी खापरखेडा विद्युत प्रकल्पापासून 16 किलोमीटर अंतरावर नांदगाव डम्पिंग ग्राउंडपर्यंत ( Nandgaon villagers oppose to Khaparkheda thermal ) पाईपलाईन टाकली आहे. पण हे टाकताना काही नियमांचे पालन करणे गरजेचे होते. ते पालन केले जात नाही. तसेच गावकऱ्यांनी विरोध केल्याने ग्रामपंचयातीने एनओसी दिली नाही.

एनजीओच्या प्रयत्नांना यश

हेही वाचा-अनिल देशमुख आज चांदीवाल आयोगासमोर हजर, अँटिलिया प्रकरणातील एटीएसचा अहवाल देण्याची मागणी

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत कारवाईचे दिले आदेश

गावकऱ्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यापुढे ऑनलाईन बैठकीतून राखेविषयीची तक्रार मांडली होती. याची पर्यावरण मंत्र्यांनी दखल घेतली. चंद्रपूर दौऱ्यावर आले असताना नांदगावच्या लोकांशी भेटणार होते. पण दौरा रद्द झाल्याने ट्विट करत त्यांनी कारवाईचे आदेश दिले. या संदर्भात प्रदूषणाचा अभ्यास करून अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे एनजीओच्या लीना बुधे यांनी सांगितले.

हेही वाचा-Yashomati Thakur On Modi : नेहरुंना प्रतिमा उंचावण्यासाठी नौटंकी चाळे करावे लागले नाहीत - ॲड. यशोमती ठाकूर

नितीन गडकरी यांचे संजय खंदारे यांना पत्र

मंथन, सीएफएसडी आणि असर फाऊंडेशनने कोराडी आणि खापरखेडा या औष्णिक विद्युत केंद्रामुळे 20 गावांना धोका निर्माण झाला आहे. औष्णिक केंद्र वीज निर्मिती करून चुकीच्या पद्धतीने कोळशापासून तयार होत असलेल्या राखेची व्हिलेवाट लावली जात आहे. याच अहवालाच्या आधारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही महानिर्मितीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांना पत्र लिहिले आहे. या प्रकरणात चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा-Hindustani Bhau : वांद्रे न्यायालयाने हिंदुस्थानी भाऊचा जामीन अर्ज फेटाळला

प्रदूषण मंडळ काय कारवाई करणार?

येत्या काळात यावर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे. तसेच या प्रकरणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे नांदगाव या ठिकाणी भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधणार का? यात प्रदूषण थांबण्याच्या अनुषंगाने प्रदूषण मंडळ काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.

Last Updated : Feb 8, 2022, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details