महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आता तुमच्या मुलांवर लक्ष ठेवणे झाले सोपे; नागपुरातील इंजिनिअरने शोधले विशेष 'ओळखपत्र' - आयटी इंजिनिअर

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच विद्यार्थींनीची सुरक्षा सर्वात महत्त्वाची असते. पालकांना आपल्या मुलीच्या सुरक्षेची चिंता सतावत असते. त्यासाठीच इंजिनिअर हरीश अडतीया याने ओळखपत्रासारखे डिव्हाईस तयार केले आहे.

ओळखपत्र

By

Published : Jul 3, 2019, 8:59 PM IST

नागपूर- आपला पाल्य वाईट संगतीत तर सापडला नसेल ना? अशी भिती प्रत्येक पालकाला असते. त्यासाठी नागपुरातील एका आयटी इंजिनिअरने आगळे-वेगळे ओळखपत्र शोधून काढले आहे. त्यामाध्यमातून पालक आपला पाल्य कुठल्या परिसरात आहे? यासह त्याच्या आवाजाचे परिक्षण करू शकणार आहेत.

विशेष ओळखपत्र शोधणाऱ्या इंजिनिअरसोबत चर्चा करताना ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी

सध्याचे जग आधुनिक तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात नाविन्यपूर्ण शोध लावले जात आहे. मात्र, या जगात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच विद्यार्थींनीची सुरक्षा सर्वात महत्त्वाची असते. पालकांना आपल्या मुलीच्या सुरक्षेची चिंता सतावत असते. त्यासाठीच इंजिनिअर हरीश अडतीया याने ओळखपत्रासारखे डिव्हाईस तयार केले आहे.

नेमके कसे आहे हे ओळखपत्र?

ओळखपत्र डिजीटल असून त्यामध्ये जीआरएस सिस्टमचा वापर करण्यात आला आहे. या ओळखपत्राला एक बटन आहे. तुमचा पाल्य अडचणीत असल्यास ते बटन दाबताच तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल. तो कुठल्या परिसरात आहे? हे देखील तुम्हाला समजेल. या ओळखपत्रामध्ये एका सिमकार्डचा सुद्धा वापर करण्यात आला आहे. त्यामाध्यमातून एकेरी संवाद होईल. तुम्ही त्यावर फोन करून त्याठिकाणी काय सुरू आहे? आजूबाजूला काही आवाज आहे का? हे समजेल. त्यावरून आपला पाल्य अडचणीत तर नाही ना? याची माहिती तुम्हाला मिळेल. विशेष म्हणजे एकेरी संवाद होणार असल्याने समोरच्या व्यक्तीला तुमचा आवाज जाणार नाही. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला न माहिती होता तुमच्या पाल्याला वाचवता येईल.

सुरक्षेच्यादृष्टीने या ओळखपत्राचा फायदा होईल. मात्र, शाळेच्या माध्यमातून किंवा पालकांनी स्वतः त्याचा चांगला उपयोग केला तरच हे ओळखपत्र फायदेशीर ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details