नागपूर- सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नागपुरात मोठी कारवाई केली आहे. ईडीने 'मेसर्स टॉपवर्थ ऊर्जा अॅण्ड मेटल्स लिमिटेड' या कंपनीची तब्बल 169 कोटी रुपयांची संपत्ती सीज केली आहे. कोळसा घोटाळ्यात या कंपनीचे व्यवहार संशयास्पद आढळल्यानंतर सीबीआयकडून या संदर्भातील तपास 'ईडी'कडे वर्ग केला होता. ईडीने सखोल तपास केल्यानंतर ही कारवाई केली आहे.
'ईडी'ची नागपुरात मोठी कारवाई; कंपनीची तब्बल 169 कोटींची संपत्ती सीज
ईडीने 'मेसर्स टॉपवर्थ ऊर्जा अॅण्ड मेटल्स लिमिटेड' या कंपनीची तब्बल 169 कोटी रुपयांची संपत्ती सीज केली आहे. कोळसा घोटाळ्यात या कंपनीचे व्यवहार संशयास्पद आढळल्यानंतर सीबीआयकडून या संदर्भातील तपास 'ईडी'कडे वर्ग केला होता. ईडीने सखोल तपास केल्यानंतर ही कारवाई केली आहे.
सीबीआयने कंपनी विरोधात केला होता गुन्हा दाखल
या कंपनीने कोळसा घोटाळ्यात "मरकी मांगली" कोळसा खाण नियमबाह्य पद्धतीने मिळवून त्याच्यातून वर्ष २०११ ते २०१४ दरम्यान तब्बल ९१ लाख २१ हजार ७४९ मेट्रिक टन कोळशाचे उत्खनन करत १६९ कोटींचा अवाजवी लाभ मिळवल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. त्यानंतर कंपनीची नागपुरातील १६९ कोटींची शेत जमीन, बिगर शेती जमीन, कार्यालय, मशीन इत्यादी संपत्ती जप्त केली आहे. कोळसा घोटाळ्याच्या तपासावेळी सीबीआयने या कंपनी विरोधात गुन्हा दाखल केला होता. सीबीआयच्या एफआयआरमध्ये या कंपनीने मनी लॉंडरिंग कायद्याचा उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर ईडीकडे तपास देण्यात आला होता.