नागपूर- राज्यात विजेची मागणी वाढली असताना राज्याच्या अनेक भागातून लोडशेडिंग संदर्भात अनेक तक्रारी पुढे आल्या आहेत. ऊर्जा मंत्रालय या समस्येचा गंभिरतेने विचार करत असून लवकरच संबंधितांवर कारवाई करणार आहे.
तांत्रिक कारण सोडून कारणा शिवाय वीज बंद ठेवली जात असेल आणि त्यामध्ये संबंधित अभियंता किंवा वीज कर्मचाऱ्यांची ( लाईनमॅन ) चूक दिसून येत असेल, तर त्यांची वेतन वाढ थांबवून त्यांच्या सर्व्हिस रेकॉर्ड मध्ये तशी नोंद केली जाईल अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. लवकरच राज्य शासन त्या संदर्भात औपचारिक निर्णय घेणार असल्याचेही बावनकुळे म्हणाले.
बेजबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार - ऊर्जामंत्री बावनकुळे - nagpur
कारण नसतानाही वीज पुरवठा खंडित करणे आता संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महागात पडणार आहे.या संदर्भांत चुक सिद्ध झाल्यास त्याचे गंभीर परिमाण संबंधितांना भोगावे लागतील या संदर्भात ऊर्जा मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत.
राज्यात लोडशेडिंग नसताना लोकांना वीज मिळत नाही आणि तरीही काही वीज अभियंते मेंटेनन्स च्या नावाखाली निष्काळजीपणाने फिडर बंद ठेवत आहेत. राज्यात पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध असताना लोकांना वीज न देणे, लोडशेडिंग नसताना फिडर बंद ठेऊन लोडशेडिंग करणे हे योग्य नाही. या अवस्थेसाठी जबाबदार अभियंता आणि वीज कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. दरम्यान, केंद्र सरकारने नॅशनल इलेक्ट्रिसिटी ग्रीड उभारण्याचे काम सुरु केले असून, त्यामुळे राज्य राज्यांमध्ये विजेची आवश्यकते प्रमाणे देवाणघेवाणी बाबत सहकार्य वाढवून विजेचा तुटवडा दूर होईल अशी अपेक्षा ही ऊर्जा मंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.