नागपूर : विमानातुन प्रवास करत असताना एका प्रवाशाला श्वास घेताना त्रास जाणवू लागला. ओमान एअरच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग ( Emergency landing of Oman Air plane ) नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमान तळावर ( Doctor Babasaheb Ambedkar International Airport ) करावे लागेल. त्या प्रवाशाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती समोर आली आहे.
Oman Air plane : प्रवाशाला श्वास घेताना जाणवू लागला त्रास; ओमान एअरच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग - passenger felt difficulty in breathing
विमानातुन प्रवास करत असताना एका प्रवाशाला श्वास घेताना त्रास जाणवू लागला. ओमान एअरच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग ( Emergency landing of Oman Air plane ) नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमान तळावर ( Doctor Babasaheb Ambedkar International Airport ) करावे लागेल.
नागपूर विमानतळावर सुरक्षित लँडिंग :ओमानच्या मस्कत येथून या विमानाने बँकॉक येथे जाण्यासाठी उड्डाण घेतले होते. विमानात बसलेल्या 47 वर्षीय नाझी नामक इसमाला श्वास घेताना त्रास होऊ लागला. त्यावेळी त्या इसमाची पत्नी आणि नातेवाईक देखील त्यांच्यासोबत होते. या बाबत विमानातील स्टाफला माहिती देण्यात आली. त्यानंतर वैमानिकांनी विमानाची इमर्जन्सी लँडिंग नागपूर विमानतळावर उतरवण्याची परवानगी मागितली. परवानगी मिळताच विमानाचे नागपूर विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले.
रुग्णाची प्रकृती ठीक: विमानाचे इमर्जन्सी लेंडिंग झाल्यानंतर त्या रुग्णाला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असून आता त्यांची प्रकृती बरी असल्याची माहिती समोर आली आहे.