नागपूर - राज्यात 'तौक्ते' चक्रीवादळाच्या तडाख्यात 11 जणांच्या मृत्यू झाल्याची माहिती असून यात काही जण बेपत्ता झाले आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे. तर 12 हजार घरांचे नुकसान झाले आहे. तर आतापर्यंत 15 हजार लोकांना सुरक्षित जागेवर हलविले आहे. प्राथमिक अंदाजानुसार या नुकसानीत वाढ होण्याची शक्यता आहे. वादळाच्या नुकसान भरपाईसाठी निकषाबाहेर जाऊन आघाडी सरकार मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे. असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. ते नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
130 गावांशी संपर्क तुटला -
वादळामुळे झालेले नुकसान मोठे असून यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत दुपारी एक वाजता सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीतून माहिती घेणार आहे. याबाबत तातडीने सविस्तर पंचनामे करण्याचे आदेश दिली आहे. रात्रीपर्यंत 130 गावांशी संपर्क तुटला होता. आज 10 ते 12 गावाचा संपर्क होत आहे. वादळ आणि विद्यूत पुरवठा खंडित झाल्याने संपर्क करण्यास अडचणी येत होत्या.
वीज यंत्रणा अंडरग्राउंड लाईनसाठी विचाराधीन -
कोणाला नेहमीच वादळाचा फटका बसतो त्यात सर्वाधिक नुकसान हे वीज वितरणचे होत आहे. कोकण किनारपट्टी वर 300 गावं अशी आहेत, जिथे नेहमीच वादळाचा फटका बसतो. यामुळे या चार जिल्ह्यात तिथे वीज यंत्रणा अंडरग्राउंड करण्याचे विचराधीन आहे. याबद्दल चर्चासुद्धा मुख्यमंत्री यांच्याशी झाली आहे.
येत्या दोन दिवसात बैठकीत निर्णय घेऊ -
येत्या दोन दिवसात कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेऊन लवकरात लवकर मदत कसे पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न केले जात आहे. कोकणात झालेल्या नुकसानसाठी महाविकास आघाडीचे स्पष्ट भूमिका आहे, मागील वेळेप्रमाणे सुद्धा निकष बदलून मदत केली होती. यावेळीही निकषांचा बाहेर जाऊन मदत करण्याचा मानस आहे.