नागपूर - मुख्यमंत्र्याचा उमेदवारी अर्ज अवैध असल्याची तक्रार दक्षिण पश्चिम मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. त्या बाबत निर्णय देण्याचा अधिकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा आहे. जिल्हाधिकारी यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकारीच बोलतील - जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे
मुख्यमंत्र्याचा उमेदवारी अर्ज अवैध असल्याची तक्रार काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. त्या बाबत निर्णय देण्याचा अधिकार निवडणूक अधिकाऱ्यांचा आहे.
हेही वाचा - नागपुरात भाजप आमदारावर नागरिक भडकले; प्रचारातून घेतला काढता पाय
निवडणूक काळात अनेक राजकीय पक्षांचे सायबर सेल कार्यरत होतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील प्रचार केला जातो. अशा वेळी आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी प्रशासन देखील सज्ज आहे. नागपूर शहरासाठी पोलीस आयुक्त कार्यलयात आणि जिल्ह्यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यलयात सायबर टीम कार्यरत आहेत. सोशल मीडियाचा गैरवापर करून आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.