नागपूर,रामटेक लोकसभा निवडणुकीत १३ हजार पेक्षा अधिक कर्मचारी करणार टपाल मतदान - nagpur
सैन्य व अन्य महत्वाच्या व्यक्तींकरिता यावेळी प्रथमच ETPBS ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ज्यात त्यांना एक युजरनेम व ओटीपी देण्यात आला आहे. त्याच्या मदतीने त्यांना आपले मत ऑनलाईन पद्धतीने पाठवता येणे शक्य होणार आहे.
टपाल मतदानासाठी नागपुरात सरकारी कर्मचाऱ्यांची नावनोदणी
नागपूर- मतदान ही लोकशाहीला मजबूत करणारी महत्वाची प्रक्रिया आहे. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात नागपूर व रामटेक या लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये जवळपास २५ हजार कर्मचारी मतदान करणार आहेत. यापैकी प्राप्त माहितीनुसार १३००० कार्मचारी टपाल पध्दतीने मतदान करणार आहेत. या टपाल मतदानाला प्रत्यक्षरित्या सुरुवात झाली असून २३ मेच्या निवडणुकीच्या निकालापर्यंत त्यांना मतदान करता येणार आहे.