नागपूर -राज्याच्या हिवाळी अधिवेशनात एकनाथ खडसे ( Eknath Khadse Attack On DCM ) यांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्लाबोल ( Separate Vidarbha State ) केला. वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, अशी भीष्म प्रतिज्ञा फडणवीस यांनी घेतली होती. त्या प्रतिज्ञाचे काय झाले? वेगळ्या विदर्भाचे काय झाले ? वेगळा विदर्भ झाला का? असा सवाल एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस ( Eknath Khadse Attack On DCM Devendra Fadnavis ) यांना केला. राजकारणासाठी लोकांची माथी भडकवण्याचा प्रकार सुरू देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची जोरदार टीकाही खडसे यांनी यावेळी केली.
वेगळ्या विदर्भावर विधान परिषदेत चर्चाहिवाळी अधिवेशनाच्या ( Nagpur Winter Session ) दुसऱ्या आठवड्यातील चौथ्या दिवशी वेगळ्या विदर्भावर विधान परिषदेत ( Eknath Khadse Attack On DCM Devendra Fadnavis ) चर्चा करण्यात आली. वेगळ्या विदर्भावरून यावेळी आरोप प्रत्यारोप झाले. विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. एकनाथ खडसे यांनी देखील राजकीय टोलेबाजी करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Eknath Khadse Attack On DCM ) यांच्यावर टीकेची चौफेर फटकेबाजी केली. वेगळा विदर्भ व्हावा, अशी कोणाची मागणी नाही. परंतु, विदर्भवासियांवर अन्याय होऊ लागल्याने देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय फायद्यासाठी वेगळ्या विदर्भाची मागणी पुढे आणली. फडणवीस सत्तेत आल्यानंतर त्यांना या मागणीचा विसर पडला. पाच वर्षे मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री आहेत. पण का वेगळा विदर्भ केला नाही, असा सवाल खडसेंनी उपस्थित केला.