महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ED Raid in Nagpur: नागपूरातील व्यापारी रामदेव अग्रवाल यांच्या कार्यालय तसेच निवासस्थानी ईडीचा छापा; काय आहे प्रकरण - व्यापारी रामदेव अग्रवाल ईडी कारवाई

आर संदेश ग्रुपचेव संचालक तसेच व्यापारी रामदेव अग्रवाल यांच्या कार्यालय आणि निवासस्थानी अंमलबाजावणी संचालनालयाच्या पथकाने छापा टाकला. मात्र, नागपूरातील काही जमिन व्यवहारांबाबत ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

ED Raid in Nagpur
ED Raid in Nagpur

By

Published : Mar 3, 2023, 8:18 PM IST

नागपूर: नागपुरचे प्रसिद्ध व्यापारी रामदेव अग्रवाल यांचे ऑफिस आणि निवासस्थानी ईडीकडून छापा टाकण्यात आला आहे. रामदासपेठच्या कॅनल रोडवरील गौरी हाईट्स येथील फ्लॅट्समध्ये ईडीचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत. रामदेव अग्रवाल यांच्या निवासस्थानी कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. रामदेव अग्रवाल यांचे शहरात मोक्याच्या ठिकाणी इमारती आहेत. आर संदेश ग्रुप या नावावे त्यांचा व्यवसाय आहे.

कोण आहेत हे व्यापारी:नागपूरातील व्यापारी रामदेव अग्रवाल यांचे आर संदेश ग्रुपचे बांधकाम आणि औषध यासह अनेक व्यवसाय आहेत. नागपुरात अनेक मोक्याच्या ठिकाणी आर संदेश ग्रुपने गेल्या काही महिन्यात जमिनी खरेदी केल्या आहेत अशा चर्चा रंगल्या आहेत. याच अनुषंगाने ईडीकडून कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

उद्योजकांमध्ये खळबळ:नागपुरातील आर संदेश ग्रुपच्या कार्यालय तसेच संचालकाच्या घरावर ईडीकडून शुक्रवारी सकाळी छापे टाकण्यात आले. संचालक रामदेव अग्रवाल यांच्या रामदासपेठ येथील निवासस्थानी अंमलबाजवणी संचालनालयाचे पथक विविध दस्तावेजांची तपासणी करत होते. या छाप्यांमुळे नागपूर शहरातील उद्योजकांमध्ये खळबळ उडाली आहे.

ईडीचे कार्यलयांवर छापे: ईडीचे पथक शुक्रवारी सकाळी रामदासपेठेतील गौरी हाईट्स या इमारतीतील वरच्या मजल्यांवरील अग्रवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले. नागपूरात सकाळी आठच्या अगोदरच पथकाने छापे टाकले व दुपारी बारा वाजेपर्यंत कारवाई सुरूच होती. यासोबतच संदेश ग्रुपच्या विविध कार्यालयांवर देखील छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. रामदेव अग्रवाल यांचे बांधकाम आणि औषध क्षेत्रात काम उद्योग आहेत. नागपूरातील काही जमिन व्यवहारांबाबत ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या कारवाई संदर्भात ईडीच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही माहिती देण्यास नकार दिला आहे.

हेही वाचा: Underworld Don Arun Gawli : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची मुदतपूर्व सुटकेसाठी उच्च न्यायालयात धाव

ABOUT THE AUTHOR

...view details