नागपूर -ईडीने गुरुवारी नागपुरातील सुपारी व्यापाऱ्यांवर छापेमारी ( Raid on betel nut traders in Nagpur ) केल्यामुळे नागपुरसह मध्य भारतातील सुपारी व्यापाऱ्यांमध्ये खळबळ ( ED raids on betel nut traders ) उडाली आहे. शहरातील सुपारीकिंग छटवाल याला आसाम पोलिसांनी अटक केल्यानंतर इतवारी मस्कासाथ येथील व्यापाऱ्यांच्या आस्थापनांवर छापे ( ED raids in nagpur ) मारण्यात आले. प्रकाश गोयल, आसिफ कलीवाला, हेमंत कुमार गुलाबचंद, वसीम बावला, दिग्विजय ट्रान्सपोर्टचे हिमांशु भद्रा आदींवर छापे मारल्याने सुपारी व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
पाच सुपारी व्यापाऱ्यांवर छापे -अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी नागपुरात एकाच वेळी पाच सुपारी व्यापाऱ्यांवर छापे टाकून कोट्यवधी रुपयांचा प्राप्तिकर जप्त केला आहे. यावेळी 18 घरे,आस्थापनांची तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाईत मुंबई, नागपूर विभागातील 130 अधिकारी सहभागी होते. या छाप्यात सुपारी व्यवसायाची मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.