नागपूर - नागपूर शहराच्या खामला परिसरात बनावट परफ्यूम बनवण्याच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली. अशोक नगर परिसरात भाड्याच्या घरात परफ्यूमचा कारखाना सुरू होता. गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकत ही कारवाई करण्यात आली. यात ब्रँडेड कंपनीच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये डुप्लिकेट परफ्यूम भरून विकले जात होते. याप्रकरणी पोलिसांनी संजयकुमार प्रदीप शर्मा (राज्य. म.प्र, जि. सतना, रा. रामपूर) या व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा -नागपूर खंडपीठाच्या लैंगिक अत्याचावरील निर्णयावर कायतेतज्ज्ञ म्हणतात...
संजय कुमार शर्मा हा अशोक नगर येथे किरायाने रूम घेऊन राहत होता. या ठिकाणी ब्रँडेड कंपनीच्या आणि बॉडी स्प्रेचा लेबल असणाऱ्या बाटलींमध्ये बनावट परफ्यूम तयार केले जात होते. याची माहिती राणा प्रतापनगर पोलिसांना मिळताच त्यांनी मिश्रा याच्या घरावर धाड टाकली. येथे त्यांना मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट परफ्यूम बनवण्याचे साहित्य, मशिनरी यासह पॅकिंगसाठी लागणाऱ्या वस्तू मिळून आल्या. याच ठिकाणी नामांकित कंपनीच्या डियो स्प्रेच्या रिकाम्या बाटल्या, तसेच अत्तरच्या काचेच्या बाटल्या, रूम फ्रेशनवर आदी साहित्य मिळून आले. यात जवळपास ५ लाख ८५ हजाराचा मुद्देमाल राणा प्रतापनगर पोलिसानी जप्त केला.
बनवट परफ्यूम शरीरासाठी अपायकारक?
बनावट परफ्यूम हे ज्या केमिकलच्या सहायाने किंवा यासाठी निकृष्ट दर्जाच्या केमिकल किंवा उग्र वास असणारे द्रव्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, असे परफ्यूम शरीरासाठी अपायकारक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.