नागपूर - कोरोनावर उपचार सुरू असलेल्या एका वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागपुरात कोरोनामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या दोन झाली आहे. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात या वृद्धाने शेवटचा श्वास घेतला. मृत्यू झालेल्या वृद्धाला उच्च रक्तदाबाचा त्रास होता.
नागपुरात कोरोनामुळे पुन्हा एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू - nagpur covid 19 death
नागपुरातील कोरोना हॉटस्पॉटपैकी एक असलेल्या मोमीनपुरा भागात राहणाऱ्या वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर २१ एप्रिलला मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे.
नागपुरात कोरोनामुळे पुन्हा एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू
नागपुरातील कोरोना हॉटस्पॉटपैकी एक असलेल्या मोमीनपुरा भागात राहणाऱ्या वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर २१ एप्रिलला मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे. या आधीसुद्धा नागपुरात एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागपुरात कोरोनाबाधित मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या दोन इतकी झाली आहे.