नागपूर - कोरोना विषाणुच्या सावटाखाली देशात सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे अनेक सणांमधील उत्साहच निघून गेला आहे. या दोन महिन्यांच्या काळात बरेच सण आले आणि रंगहीन झालेत. आज नागपूरसह देशभरात ईद साजरी केली जात आहे. याप्रसंगी मशिदी आणि ईदगाहांमध्ये जिथे ईदच्या दिवशी मोठी रौनक असायची, तिथे आज विचित्र निर्जनता आणि भयाण शांतता आहे.
ईद घरातूनच होतीये साजरी; कोरोनामुळे मुस्लीम बांधवांनी घेतली काळजी - eid amid corona
कोरोनाचा धोका लक्षात घेता ईद घरीच राहून साजरी करण्याचे आवाहन शासन, प्रशासन आणि मुस्लीम धर्मगुरूंनी केले होते. यानंतर नागपुरात ईद अत्यंत साधेपणाने घरी साजरी करण्यासाठी मुस्लीम समाजाने पुढाकार घेतला.
कोरोनाचा धोका लक्षात घेता ईद घरीच राहून साजरी करण्याचे आवाहन शासन, प्रशासन आणि मुस्लिम धर्मगुरूंनी केले होते. यानंतर नागपुरात ईद अत्यंत साधेपणाने घरी साजरी करण्यासाठी मुस्लीम समाजाने पुढाकार घेतला. महिनाभराचे कडक उपवास म्हणजेच रोजे पूर्ण झाल्यानंतर आज नागपूरसह संपूर्ण जगात ईद साजरी केली जात आहे.
ईदला मुस्लीम समाजात विशेष महत्त्व आहे. प्रत्येक मुस्लीम बांधव कुटुंबीयांसह ईदचा आनंद साजरा करतो. परंतु यावर्षी कोरोना विषाणुने ईदच्या उत्साहाला ग्रहण लावले आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. ईदच्या दिवशी मुस्लीम वर्ग सकाळपासून ईदगाह आणि मशिदीत विशेष नमाजांसाठी जातात. पण आज त्याच मशिदींमध्ये भयाण शांतता आहे. शहरात जामा मशीद आहे. या मशिदीत ईदच्या दिवशी दहा हजारांहून अधिक लोक नमाज अदा करतात. परंतु कोरोनामुळे मशिदीसह ईदगाहमध्ये ईदच्या दिवशी निर्जनता बघायला मिळेल असा साधा विचारही कुणी केला नसेल. ज्या भागात जामा मशिदी आहे त्या मोमीनपुराच्या भागात सर्वाधिक कोरोनाबाधित असल्याने हा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. यावेळी ईद घरीच साजरी होत असल्याचा आनंद असला तरी तो उत्साह मात्र कुठेच दिसून आला नाही.