नागपूर- नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दारुड्या बापाने स्वतःच्याच एक वर्षीय चिमुकल्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सत्यम भजन कौरती (वय, १) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तर भजन कौरती असे आरोपीचे नाव असून, खापरखेडा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना बुधवारी घडली आहे.
सत्यमला अंगणातील दगडावर फेकले
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपी भजन कौरती हा दारूच्या नशेत घरी आला, तेव्हा त्याने पुन्हा दारू पिण्यासाठी पत्नी कडे पैसे मागितले. तेव्हा त्याच्या पत्नीने पैसे देण्यास नकार देताच, भजन याने वाद घालायला सुरवात केली. मला मुलगी हवी होती, तू मुलाला जन्म दिल्याच म्हणत भजन याने चिमुकला सत्यमला अंगणातील दगडावर फेकले. त्याच्या डोक्याला ईजा झाल्याने सत्यामचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना क्षणात घडल्याने सत्यमला वाचवण्याची कुणालाही संधी मिळाली नाही. आरोपी भजन याची पत्नी मथुराच्या तक्रारीवरून खापा पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा -जळगाव जिल्ह्यात 'सायटोमेगालो' व्हायरसचा पहिला बळी!